Zenith Drug IPO Review आणि सर्व माहिती मराठीत

Zenith Drug IPO Review in Marathi: शेअर बाजारामध्ये इनिशियल पब्लिक ऑफरिंगसाठी झेनिथ ड्रग लिमिटेड दाखल झालेली आहे. यातून कंपनीचे उद्दिष्ट ₹40.68 कोटी उभारण्याचे आहे. हा SME IPO 27 फेब्रुवारी रोजी मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे. यासाठी अर्ज करण्याअगोदर Zenith Drug IPO Review आणि सर्व माहिती बद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

Zenith Drug IPO Review आणि इतर माहिती

Zenith Drug IPO Review in Marathi gmp details price

मुख्य तारखा

19 ते 22 फेब्रुवारी दरम्यान अप्लाय करण्याची मुभा असणार आहे. ही मुदत संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अलॉटमेंट जाहीर केली जाईल. 26 तारखेला ज्यांना अलॉटमेंट भेटली आहे, त्यांच्या डिमॅट मध्ये शेअर्स दिले जातील. 27 फेब्रुवारीला NSE आणि SME वर लिस्टिंग केली जाणार आहे.

लॉट साईज आणि किंमत

एका लॉटमध्ये 1600 स्टॉक्स असणार आहेत. या सगळ्याची किंमत 1,26,400 रुपये ठेवण्यात आली आहे. HNI ला 2 आणि रिटेलला 1 लॉटला अर्ज करण्याची परवानगी आहे.

प्राईस बँड

प्राईस बँड हा 75 ते 79 रुपये ठेवण्यात आलेला आहे आणि फेस व्हॅल्यू 10 रुपये प्रति शेअर आहे. कमी किमतीमुळे ओव्हर सबस्क्राईब होण्याची चिन्हे जास्त आहेत.

टोटल इश्यू साइज

40.68 कोटी रुपये किमतीचे 51,48,800 शेअर्स बाजारात आणले जाणार आहेत.

उद्दिष्ट

स्टॉक मार्केटमध्ये येण्याच्या त्यांच्या मुख्य उद्दिष्टामध्ये नवीन प्लांटसाठी मशनरी खरेदी करणे आणि वर्किंग कॅपिटल निर्माण करणे यांचा समावेश आहे.

प्रमोटर्स

कंपनीच्या संस्थापकांनी आतापर्यंत कोणत्याही एंजल इन्वेस्टर कडून गुंतवणूक घेतलेली नाही. 100 टक्के कंपनी त्यांच्या मालकीची आहे. प्रमोटर्समध्ये भूपेश सोनी, अजय सिंग दसुंडी आणि संदीप भारद्वाज यांचा समावेश आहे. लिस्ट झाल्यानंतर त्यांच्याकडे 69.98% इक्विटी राहणार आहे.

Zenith Drug IPO Review

दिलीप दवडा

Chittorgarh चे मुख्य ॲनालिस्ट दिलीप दवडा यांनी सांगितले की, कंपनीचे फायनान्शिअल खूप चांगले आहेत. चांगले असले तरीही आर्थिक वर्ष 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये त्यांच्या महसुलात अचानक दुप्पट वाढ दिसून येऊ शकते, ही एक चिंतेची बाब आहे. त्यामुळे शॉर्ट टर्मसाठी अप्लाय करण्यासाठी उत्तम आहे.

मारवाडी ब्रोकरेज

यांच्या मते, शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहिली पाहिजे आणि त्यानंतरच निर्णय घेण्यात यावा.

Zenith Drug IPO Gmp

14 रुपयांच्या जीएमपीवर हा सध्या ट्रेड करत आहे. ही किंमत शेवटपर्यंत अशीच राहिल्यास 17 टक्के परतावा हा कमी कालावधीत भेटू शकतो.

Esconet Technologies Limited IPO details आता मराठी मध्ये

Scroll to Top