PSU Stocks का पडत आहेत?

PSU Stocks Fall

PSU Stocks मध्ये 12 फेब्रुवारी रोजी भयंकर विक्री पाहायला मिळाली. या शेअर्समध्ये जानेवारी महिन्यात एक चांगली रॅली झाली होती. 12 फेब्रुवारीला पीएसयु इंडेक्स तब्बल 5 टक्क्यांपेक्षा जास्त ने पडला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. या इंडेक्स मधील बऱ्याच कंपन्यांचे तिमाहीचे निकाल समोर आले आहेत. अपेक्षेपेक्षा हे निकाल खराब आल्यामुळे ही पडझड झाली आहे.

PSU Stocks पडण्याची मुख्य कारणे आणि इतर माहिती

why all psu stocks are falling reasons

मुख्य कारणे

12 फेब्रुवारी रोजी एसबीआय तीन टक्के खाली होता. त्याचबरोबर NHPC आणि RVNL हे PSU Stocks जवळपास 10 टक्क्यांनी कोसळले होते. त्यामुळेच पूर्ण इंडेक्स 5 टक्क्यांनी खाली होता. गेल्या वर्षभरातील एका दिवसांमधील सर्वात जास्त सेलिंग ही होती. या कंपन्यांचे तिमाहीचे निकाल खराब लागले होते. त्याचाच परिणाम म्हणून ही घसरण दिसली. यांना नफा झालेला होता, परंतु त्या नफ्यात घट दिसली होती. त्यांच्याकडून सांगण्यात आली आहे की, ही घट तात्पुरत्या स्वरूपाची आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही यात सुधारणा करू.

2023 च्या बजेट पासून रॅली

2023 च्या बजेट नंतर सरकारी कंपन्यांमध्ये रॅली झाली होती. ही रॅली जवळपास 45% च्या वर होती. यामध्ये मुख्य योगदान हे रेल्वे सेक्टर मधील शेअर्सचे होते. रेल्वेचे काही शेअर हे एका दिवसात 10% ची उसळी मारताना पाहायला मिळाले होते.

आता अशी आहे स्थिती

एवढी मोठी पडझड झाली असली तरी हा इंडेक्स सपोर्ट वर ट्रेड करत आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे या सेक्टर मधील स्टॉक आहेत, त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. गुंतवणूकदारांना या कंपन्या Dividend देत असतात. त्यामुळे लोक या कंपन्यांचे शेअर्स विकण्याचा जास्त विचार करत नाही. एवढ्या मोठ्या रॅली नंतर ही प्रॉफिट बुकिंग येणे सहाजिकच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा सांगितले आहे की, येणारा काळ हा गव्हर्मेंट सेक्टरचाच असेल.

FAQ

  1. शेअर बाजारात PSU म्हणजे काय?

    शेअर बाजारातील PSU म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आहेत आणि त्यात मुख्य करून सरकारचा सर्वाधिक वाटा आहे.

  2. ONGC पीएसयु आहे का?

    होय, ONGC ही पीएसयु आहे.

  3. PSU Index काय आहे?

    सरकारच्या मालकीच्या कंपन्या भारतीय शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असतात. या सर्व सरकारी कंपन्यांना मिळून निफ्टी सारखा एक इंडेक्स असतो, त्याला PSU Index म्हणतात.

जाणून घ्या Bharat Forge dividend देणार चांगला तरीही शेअर 13% पेक्षा जास्त पडला

Scroll to Top