पुण्यात ओला आणि उबरने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावला

...........................................................................

पुण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी एसी टॅक्सीच्या भाड्यामध्ये वाढ करण्याचे आदेश दिले होते, तरीही ओला आणि उबरने तसे केले नाही.

...........................................................................

काही दिवसांपूर्वी टॅक्सी चालकांकडून भाडेवाडीसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.

...........................................................................

या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी संप करण्याचे ठरवले आहे.

...........................................................................

37 रुपये पहिल्या दीड किलोमीटरसाठी आणि त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला 25 रुपये असा प्रस्ताव देण्यात आला होता.

...........................................................................

जानेवारी महिन्यापासून ही वाढ लागू झालेली होती, तरीही त्यावर Ola आणि Uber ने प्रतिसाद दिला नाही.

...........................................................................

कॅबचालकांनी 20 फेब्रुवारी पासून बेमुदत संप सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.

...........................................................................

याप्रकरणी कलेक्टर कोणती भूमिका घेतात याकडे सर्व चालकांचे लक्ष लागले आहे.