नुकताच शार्क टॅंक इंडियाचा सीजन थ्री चालू झालेला आहे. यात वेगवेगळे स्टार्टअप्स फंडिंग मिळवण्यासाठी येतात. त्यात महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्याच्या देवांश बोचरेने भाग घेतला होता. त्याने Vold Energy Drink असे ब्रँडचे नाव ठेवले आहे. या कंपनीमध्ये त्याने आतापर्यंत कोणालाही कामावर ठेवलेले नाही. तो स्वतःच सगळं मॅनेज करतो आहे.
Vold Energy Drink बद्दल सर्व माहिती
अशी झाली ब्रँडची सुरुवात
Vold Energy Drink owner देवांश यांनी कॉलेज ड्रॉप आउट झाल्यानंतर या कंपनीची स्थापना केली होती. त्यांच्या मनात स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट बनवायचं स्वप्न होतं. ते सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी विविध सप्लायर्सच्या भेटी घेण्याचे काम सुरू केले. गुजरातच्या एका व्यक्तीने त्यांना मदत केली. वडिलांकडून पाच लाख रुपये अशी इनिशियल इन्वेस्टमेंट भेटल्यानंतर त्यांनी कामाला जोमात सुरुवात केली. त्यांची कार त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने रॅपिंग करून घेतली आणि तीच त्यांची मुख्य मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. विनिता सिंग आणि अनुपम मित्तल यांनी तर कारला पाहून आ वासले होते. कंपनीमध्ये ते स्वतःच सर्व ऑपरेशन्स हँडल करतात. मुंबई,पुणे आणि अहमदनगर या शहरांमध्ये हे एनर्जी ड्रिंक उपलब्ध आहे.
नेटवर्थ आणि रेव्हेन्यू
Vold Energy Drink net worth 1 कोटींची आहे. त्यांनी आतापर्यंत 30 लाखांचा रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे. त्यांच्या एका कॅनची किंमत 60 रुपये आहे. एनर्जी ड्रिंक त्यांना 28 रुपयांना पडते. त्यानंतर डिस्ट्रीब्यूटरला 43 रुपयांना ते विकतात आणि पुढे रिटेलरला ही किंमत 48 ते 50 रुपये असते. हाच रिटेलर 60 रुपयांना ते कस्टमरला देतो. यामध्ये 38% हे ग्रॉस मार्जिन असते आणि 25% नेट मार्जिन राहते.
शॉर्ट टॅंक इंडिया सीजन 3 मध्ये अमन गुप्ताची ऑफर
काही जजेसने सांगितले की, या ब्रँडला मोठा करण्यासाठी खूप पैसा लागणार आहे, त्यामुळे या कारणास्तव आम्ही सध्या यात पैसे गुंतवू शकत नाही. अमन गुप्ताने 10% साठी त्यांना 10 लाख रुपये, कर्ज म्हणून 40 लाख रुपये आणि 3% रॉयल्टी 40 लाख रुपये परत भेटेपर्यंत द्यावे अशी ऑफर दिल्यानंतर देवांशी यांनी ती घेतली.
प्रॉडक्टचे केले कौतुक
टेस्ट करण्यासाठी जजेसला जेव्हा ड्रिंक देण्यात आले, त्यावेळी त्यांनी खूप कौतुक केले. रेड बुल सारखीच चव आहे, असे त्यांनी सांगितले.
शार्क टँक इंडियाचे हे जजेस स्वतःच आहेत तोट्यात?