Ola valuation तब्बल 30 टक्क्यांनी कमी केले या अमेरिकन कंपनीने

Vanguard Slashes Ola Valuation

अमेरिकेची असेट मॅनेजमेंट कंपनी Vanguard ने Ola valuation तिसऱ्यांदा कमी केलेले आहे. सर्वात जास्त व्हॅल्युएशन पासून त्यांनी आतापर्यंत 74 टक्क्यांनी घटवले आहे. आता Ola Cab Valuation हे दोन बिलियनच्या आत आले आहे. त्यामुळे आयपीओ येण्याअगोदर कंपनीला मोठा झटका बसलेला आहे.

आता असे आहे Ola Valuation

व्हॅनगार्डने 1.9 बिलियन पर्यंत खाली आणले आहे. US सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनमध्ये दिलेल्या फायलींग वरून हे समोर आले आहे. याबद्दलचे कारण त्यांनी यात समाविष्ट केलेले नाही. डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी ओलाची पॅरेंट कंपनी आणि Ani Technologies मध्ये $139 मिलियनची गुंतवणूक केली होती.

Vanguard Slashes Ola Valuation

मागील वर्षी असे केले होते कमी

त्यानंतर मे 2023 मध्ये 7.4 बिलियन Ola Valuation वरून $3.5 बिलियनवर आणले होते आणि त्याच वर्षीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा एकदा कमी करून $2.7 बिलियन केले.

हे आहेत मोठे गुंतवणूकदार

2010 मध्ये भाविश अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या या स्टार्टअपमध्ये टायगर ग्लोबल, Vanguard आणि सॉफ्ट बँक यांच्याकडून खूप मोठी गुंतवणूक भेटली होती. त्यांच्या मते, जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या देशात व्यापार वाढवण्यासाठी आणि Uber साठी हा एक मोठा पर्याय होऊ शकतो. जगामध्ये आर्थिक मंदी चालू होण्याच्या तयारीत असताना मोठे इन्वेस्टर्स स्टार्टअप विषयी त्यांची व्हॅल्यू रिॲडजस्ट करताना दिसत आहे. अलीकडेच मिशो कंपनीचे व्हॅल्युएशन $3.5 बिलियनने सॉफ्ट बँकेकडून कमी करण्यात आले. स्विगीचे सुद्धा $8.3 बिलियन Invesco कडून करण्यात आले होते.

वाढणारी स्पर्धा

उबर आणि रॅपिडो यांच्याकडून खूप आव्हान उभे राहत चालले आहे. तसेच नवीन येणारे स्टार्टअप सुद्धा अडचणीचे ठरत आहेत. सरकारकडून लावण्यात येणाऱ्या अटींमुळे मोठे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळेच अजून या कंपनीला वाढवण्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये आयपीओ आणला जाणार आहे.

नफा

ही लॉस मेकिंग कंपनी आहे. आता मात्र त्यांनी 65% पेक्षा जास्त तोटा कमी करण्यात यश मिळवले आहे. FY22 मध्ये 1522 कोटी रुपयांचा तोटा कमी होऊन त्यांनी FY23 मध्ये 772 कोटी रुपयांचा लॉस दाखवला होता. शेअर बाजारमध्ये आल्यानंतर गुंतवणूकदारांकडून मिळणारा प्रतिसादच कंपनीला चांगली दिशा देऊ शकतो. भाविश अग्रवाल यांनी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ओलाला एक नंबरची कंपनी बनवले आहे.

Flipkart Binny Bansal resigns: फ्लिपकार्ट मधील बंसल साम्राज्य संपुष्टात!

Scroll to Top