Thaai Casting Limited IPO Review आणि details आहेत चांगल्या, बघा मग रडवणार की हसवणार?

Thaai Casting Limited IPO Review: मोठ्या ब्रोकरेज कंपन्यांनी या एसएमई आयपीओ बद्दल चांगला रिव्ह्यू दिलेला आहे. थाई कास्टिंग लिमिटेड इनिशियल पब्लिक ऑफरिंगमधून ₹47.20 कोटी उभारणार आहे. 15 फेब्रुवारी पासून यासाठी अर्ज करता येईल.

जून 2010 मध्ये थाई कास्टिंग लिमिटेडची स्थापना झाली होती. हाय प्रेशर डाय कास्टिंगमध्ये त्यांचे मुख्य काम चालते आणि ही सर्व मॅन्युफॅक्चरिंग तमिळनाडू या राज्यात होते. त्यांच्या कंपनीत 132 कर्मचारी आहेत. रिव्ह्यू सोबतच याच्या सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत.

Thaai Casting Limited IPO Review आणि डिटेल्स

Thaai Casting Limited IPO Review

Thaai Casting Limited IPO Details

आयपीओची साईज

इनिशिअल पब्लिक ऑफरिंगद्वारे कंपनी 61,29,600 शेअर्स बाजारामध्ये आणणार आहे. या सगळ्यातून त्यांचे उद्दिष्ट ₹47.20 कोटी उभारणे आहे.

महत्त्वाच्या तारखा

15 ते 20 फेब्रुवारी दरम्यान अप्लाय करण्याची तारीख असेल. 21 तारखेला रिफंड येईल आणि अलॉटमेंट जाहीर केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी डिमॅट खात्यात शेअर्स दिले जातील. 23 फेब्रुवारीला थाई कास्टिंग लिमिटेड NSE आणि SME वर लिस्ट केली जाणार आहे.

प्राईस बँड

73 ते 77 रुपये प्रति शेअर अशी किंमत ठेवण्यात आली आहे. त्याची फेस व्हॅल्यू 10 रुपये राहणार आहे.

लॉटची किंमत

एका लॉटमध्ये 1,600 शेअर्स दिले जाणार आहेत. त्यांची किंमत जवळपास 1,23,200 रुपये होईल.

उद्देश

स्टॉक मार्केटमध्ये येण्याच्या त्यांच्या मुख्य उद्दिष्टांमध्ये भांडवली खर्चाची पूर्तता, कंपनीची वाढ आणि समस्यांना सामोरे जावे लागण्यासाठी लागणारा खर्च भरून काढणे हे समाविष्ट आहे.

प्रमोटर

कंपनीच्या प्रमोटर्समध्ये श्रीरामुलू आनंदन, चीनराज वेंकटेसन आणि आनंदन शेवानी यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे 86.50% यापूर्वी हिस्सेदारी होती.

फायनान्शियल

त्यांचा टॅक्सनंतर निव्वळ नफा 336% ने वाढलेला आहे. तसेच महसूल 27.84 टक्क्यांनी वाढला आहे. त्यांचे मार्केट कॅप ₹178.1 कोटींचे आहे.

Thaai Casting Limited IPO gmp

ग्रे मार्केटमध्ये सध्या 24 रुपयांच्या प्रीमियमवर हा स्टॉक ट्रेड करत आहे. त्यामुळे लिस्टिंगच्या दिवशी 31 टक्क्यांपर्यंतचा परतावा भेटू शकतो.

Thaai Casting Limited IPO Review

दिलीप दावडा यांच्या मते, कंपनीकडून दिलेली किंमत एकदम बरोबर आहे. त्यांचे फायनान्शिअल्स खूप स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्म साठी सुद्धा हा स्टॉक खूप फायदेशीर ठरू शकतो.

आनंद राठी वेल्थ यांच्या मते, गुंतवणूकदारांसाठी ही खूप चांगली संधी आहे. लिस्टिंग नंतर सुद्धा तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये हा स्टॉक असल्यास चांगली वाढ मिळू शकते.

यावरून नक्कीच तुम्हाला Thaai Casting Limited IPO Review आणि सर्व डिटेल्स भेटले असतील आणि यावर तुम्ही तुमच्या पद्धतीने योग्य निर्णय घ्याल. येथे आम्ही कुठलाही स्टॉक खरेदी किंवा विक्री करण्याचा सल्ला देत नाही.

तब्बल 70 टक्के जीएमपी असणारा Vibhor Steel Tubes IPO Details बघा

Scroll to Top