नवीन वर्षामधील एक जानेवारी रोजी टाटा कॉफी ही कंपनी टाटा कंझ्यूमर प्रॉडक्ट लिमिटेड (TCPL) मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. Tata coffee merger मधे एक जानेवारीपासून टाटा कॉफी ही वेगळी कंपनी नसून टाटा कंझ्यूमर मध्ये समाविष्ट केली जाईल. 28 डिसेंबर रोजी कंपनीच्या ऑफिशियल अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की, टाटा कॉफी प्लांटेशन वेगळे करून तिला TCPL बेवरेजेस अँड फुड्स युनिटमध्ये समाविष्ट करण्यात येईल.
या कारणामुळे टाटा कॉफीचे करण्यात येत आहे मर्जर
Tata coffee merger चे मुख्य कारण सांगण्यात येत आहे की, कंपनीला त्यांची कार्यक्षमता आणि इतर गोष्टीची वाढ करायची असल्यामुळे हे करण्यात आले आहे. हे एकत्रीकरण झाल्यामुळे कंपनीची पुनर्रचना करण्यात येईल आणि मॅनेजमेंट सुरळीत होईल.
एक्सचेंजला Tata coffee merger बद्दल हे सांगितले
संचालक मंडळांने सांगितले आहे की, यासाठी लागणाऱ्या सर्व अटींची पूर्तता करण्यात आलेली आहे. यामध्ये INC-28 मधील कंपनीच्या रजिस्टारकडे ऑर्डरच्या प्रमाणित प्रती दाखल करण्याचा समावेश करण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या 1 जानेवारी 2024 नंतर Tata coffee ही वेगळी कंपनी नसून TCPLचाच एक भाग असेल. या कंपनीचे अस्तित्व नष्ट न करता ती मुख्य कंपनीमध्ये मिसळली जाईल. यानुसार कंपनीतील सगळे मॅनेजर लेव्हलचे कर्मचारी आणि डायरेक्टर्स यांचे कार्यालय त्यादिवशी रिकामे ठेवण्यात येणार आहेत.
या तारखेपर्यंत शेअर्सचे वाटप कसे करायचे ठरवले जाईल
15 जानेवारी 2024 ही तारीख शेवटची तारीख म्हणून निवडलेली आहे. Tata coffee merger नंतर हिस्सेदारांचे क्लॉज 13.1 आणि 20.1 नुसार टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड चे इक्विटी शेअर्स वाटप करण्याच्या हेतूने 15 जानेवारी 2024 ही तारीख रेकॉर्ड म्हणून सेट करण्यात आलेली आहे, असे टाटा कॉफी कडून सांगण्यात आले आहे.
अशाप्रकारे झाला निर्णय
2022 मध्ये Tata consumer product limited, TCPL बेवरेजेस आणि फुड्स व Tata कॉफी यांच्या शेअर होल्डर्सची एक मीटिंग ठेवण्यात आली होती. सर्वांनी या निर्णयाला समर्थन दिले होते. त्यामुळे Tata coffee merger हे TCPL आणि तिच्या सबसिडरी मध्ये केले जाईल.
शेअर होल्डर्स ला अशा प्रकारे मिळणार शेअर्स
Tata coffee merger मध्ये प्लांटेशन बिजनेस हा TCPL बेवरेजेस अँड फुड्स मध्ये समाविष्ट केला जाईल, जी टीसीपीएलची उपकंपनी आहे. यासाठी TCPL टाटा कॉफीचे 22 शेअर्स असणाऱ्या व्यक्तीला 1 शेअर देणार आहे.
बाकी राहिलेला बिजनेस हा टीसीपीएल मध्ये एकत्रित केला जाणार आहे. या एकत्रीकरणासाठी Tata consumer product हे 55 शेअर्स मागे 14 शेअर्स TCPL चे देणार आहे.
हे असे केल्यामुळे या कंपनीचे अस्तित्व टिकून राहील आणि कुठल्याही शेअर होल्डरला धोका होणार नाही. या सर्वांचूक एकूण जर आपण काढली तर Tata coffee merger नंतर शेअर होल्डर्सला 10 शेअर्स मागे तीन शेअर्स देण्यात येणार आहेत.
Tata Coffee merger into Tata Consumer, TCPL Beverages from Jan 1. #tatacoffee #TataConsumer pic.twitter.com/rTBPEZGzQY
— The Wealth Creation (@TheWealthelite) December 28, 2023
या न्यूज नंतर शेअर्समधे उसळी
टाटा कॉफी
ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहे. ही बातमी सर्वांना कळल्यानंतर 28 डिसेंबर रोजी 2:30PM नंतर या स्टॉक मध्ये एक पर्सेंट ची उसळी पाहायला मिळाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 डिसेंबर रोजी हा शेअर गॅपअप ओपन होऊन चार टक्क्यांनी वाढला होता. आदल्या दिवशी 308 वर तो बंद झाला, त्यानंतर दुसर्याच दिवशी 311 च्या आसपास ओपन होऊन पहिल्या दहा मिनिटातच त्याने 321 किंमत गाठली होती.
Tata consumer
Tata coffee merger च्या बातमी नंतर 28 डिसेंबर रोजी 2:30 च्या सुमारास 1030 वर ट्रेड करत असलेला शेअर 20 रुपयांनी वर जाऊन 1050 ला बंद झाला. त्यादिवशी यामध्ये 2% उसळी पाहायला मिळाली. दुसऱ्या दिवशी गॅपअप ओपन होऊन 2:30 टक्क्यांनी हा शेअर वधारलेला होता. पहिल्या 5 मिनिटांतच 1050 वरून तो 1077 ला पोहोचला होता.
या शेअर्समध्ये एवढी उसळी असण्याचे कारण की, शेअरहोल्डर्सचा TATA च्या कंपन्यांवर खूप विश्वास आहे.
धीरूभाई अंबानींच्या या निर्णयामुळे शेअर मार्केट राहिले होते तब्बल तीन दिवस बंद
FAQ
भारतातील सर्वात मोठा कॉफी ब्रँड कोणता आहे?
टाटा कॉफी हा भारतातील सर्वात मोठा कॉफी ब्रँड आहे.
टाटा कॉफी कडे कोणते ब्रँड आहेत?
त्यांच्याकडे टाटा कॉफी ग्रँड, विटॅक्स आणि Eight O Clock Coffee असे ब्रँड्स आहेत.
स्टारबक्स हे टाटाचे आहे का?
स्टारबक्स हे 50:50 जॉईंट वेंचर मधील टाटा कंजूमर प्रॉडक्ट आणि स्टारबक्स कॉर्पोरेशनचे आहे.
सगळ्यात जास्त यशस्वी कॉफी कंपनी कोणती आहे?
स्टार बॉक्स ही सर्वात जास्त यशस्वी कंपनी आहे.
भारतातील कॉफी किंग कोणाला म्हटले जाते?
व्ही. जी. सिद्धार्थ यांना भारतातील कॉफी किंग म्हणून ओळखले जाते.
भारताचा कोणता कॉफी ब्रँड आहे?
‘कृती कॉफी’ हा एकमेव भारतीय ब्रँड आहे.
फादर ऑफ कॉफी कोण आहेत?
‘गोट हर्डर कल्डी’ हे एक इथोपियन नागरिक आहेत ज्यांनी कॉफीचा शोध लावला.