Subramanian Swamy Axis Bank: भाजपच्या सुब्रमण्यम स्वामींची ॲक्सिस बँकेच्या विरोधात न्यायालयात याचिका

Subramanian Swamy Axis Bank: भाजपचे सुब्रमण्यम स्वामी यांनी देशातील पहिल्या दहा क्रमांकाच्या प्रायव्हेट बँकेमध्ये असणाऱ्या ॲक्सिस बँकेवर ₹4,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. या विरोधात त्यांनी दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे.

असे आहे Subramanian Swamy Axis Bank पूर्ण प्रकरण

Subramanian Swamy Axis Bank (2)

आरोप

ॲक्सिस बँकेने कुणाचीही परवानगी न घेता मॅक्स लाइफ इन्शुरन्सच्या शेअरची विक्री आणि खरेदी करून 4,000 कोटी रुपयांचा नफा कमवलेला आहे. हा नफा नियमबाह्य आणि कायद्याचे उल्लंघन करून केलेला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाविषयी न्यायालयाने दखल घ्यावी आणि तपास करून दोषींना शिक्षा करावी, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी कोर्टात म्हटले. त्यासाठी त्यांनी दिल्लीच्या उच्च न्यायालयात याविषयी जनहित याचिका दाखल केलेली आहे.

सुनावणी पुढे ढकलली

मुख्य न्यायाधीश मनमोहन आणि मनमित प्रीतम सिंग अरोरा यांनी प्रतिस्पर्धी वकिलांना या याचिकेची प्रत न भेटल्यामुळे 13 मार्चपर्यंत पुढील सुनावणी घेण्यास स्थगिती दिलेली आहे.

सुब्रमण्यम स्वामींचे म्हणणे

Subramanian Swamy Axis Bank वर बोलताना म्हटले की, हा स्कॅम खूप मोठा असल्यामुळे यासाठी एक समिती बनवावी आणि त्यांनी सर्व व्यवहार जगासमोर आणले पाहिजेत. या व्यवहारात पारदर्शकता न ठेवून नियमांचे उल्लंघन केले गेले आहे. आयआरडीएआई ने याप्रकरणी मॅक्स लाइफला तीन कोटींचा दंड ठेवलेला आहे, परंतु हे त्या फ्रॉडपुढे खूपच कमी आहे. येणाऱ्या काळात हे थांबवण्यासाठी समितीने यावर निष्कर्ष काढून ठोस निर्णय घेतला पाहिजे आणि कडक नियम बनवले पाहिजेत.

याचिकेतील मुख्य मुद्दे

Subramanian Swamy Axis Bank प्रकरणावरील याचिकेत सांगितले गेले आहे की, त्यांनी 2021 मध्ये मॅक्स लाइफ मधील 0.998 टक्के हिस्सा MFSL आणि मित्सुई सुमिटोमो इंटरनॅशनलला 166 रुपयांच्या किमतीत विकला होता. त्यानंतर अल्पावधीतच म्हणजे एप्रिल महिन्यात पुन्हा 31.51 ते 32.12 रुपयांच्या किमतीने शेअर्सची पुन्हा खरेदी करण्यात आली. यातून त्यांना जवळपास चार हजार कोटींचा नफा जमा झाला होता.

ॲक्सिस कडून स्पष्टीकरण

त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, आम्ही सर्व रेगुलेटरच्या संमतीने आणि नियमांना धरून हा व्यवहार केलेला आहे. त्यामुळे हा कुठलाही स्कॅम नाही.

याविषयी न्यायालयाने आश्वासन दिले आहे की, याची पूर्ण चौकशी केली जाईल आणि गैरप्रकार आढळल्यास यातील दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल

वयाच्या 27 व्या वर्षी Youngest billionaire in India बनला पर्ल कपूर

Scroll to Top