Stocks to watch today: मॅक्स फायनान्शिअल, वेदांता, इंडिगो, पेटीएम, अल्पेक्स सोलर, यूपीएल आणि एंन्टेरो हेल्थकेअर

Stocks to watch today: भारतीय स्टॉक मार्केट शुक्रवारी पॉझिटिव्हमध्ये खुले होण्याची शक्यता आहे. याचे कारण विदेशातील मार्केट सद्यस्थितीला पॉझिटिव्ह दिसत आहेत. आज प्रामुख्याने गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सचे लक्ष असणाऱ्या स्टॉकची माहिती तुम्हाला इथे दिले जाणार आहे. त्यामध्ये मॅक्स फायनान्शिअल, वेदांता, इंडिगो, अल्पेक्स सोलर, यूपीएल, पॉलिसील इरिगेशन सिस्टम, येस बँक, मेडप्लस हेल्थ सर्विसेस, सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज आणि एंन्टेरो हेल्थकेअर यांचा समावेश आहे.

Stocks to watch today

Stocks to watch today

मॅक्स फायनान्शिअल

Max Life insurance आणि ॲक्सिस बँक यांच्या इक्विटी शेअरच्या खरेदी आणि विक्रीतून खूप नफा कमावल्याचा आरोपावरून दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यात Max financial ने म्हटले आहे की, कुठलाही गैरप्रकार आम्ही केलेला नाही. हा सर्व व्यवहार रेगुलेटरच्या मंजुरीनंतरच करण्यात आला आहे.

Vedanta

फिनसाइडर इंटरनॅशनल या प्रमोटर कंपनीने खुल्या बाजारात त्यांच्या मालकीचे 6,55,18,600 इक्विटी शेअर्स विकले आहेत. त्यांची किंमत जवळपास ₹1,734.76 कोटी होते.

Indigo

डिरेक्टोरेट जनरल ऑफ एव्हिएशनने जारी केलेल्या माहितीत असे दिसून आले आहे की, इंडिगोचा मार्केट शेअर थोडासा कमी होऊन 60.2% वर आला आहे.

अल्पेक्स सोलर

Alpex solar ने लिस्टिंगच्या दिवशी जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. आता BOFA सिक्युरिटीजने 2.2 लाख शेअर्स 337 रुपयांच्या किमतीने खरेदी केले आहेत.

यूपीएल

UPL मागील काही दिवसांपासून जवळपास 13 टक्क्यांनी खाली आहे. त्यातच आता ‘फिच’ या रेटिंग एजन्सीने BBB -ve चे रूपांतर BB+ मध्ये करून डाऊनग्रेड केले आहे.

एंन्टेरो हेल्थकेअर सोल्युशन्स

Intero health care solutions ही कंपनी आज NSE आणि BSE वर लिस्ट होणार आहे.

येस बँक

Yes Bank ची 1.35 टक्के हिस्सेदारी Carlyle ग्रुपने खुल्या बाजारात विकून टाकली आहे. त्याची किंमत ₹1,056.9 कोटी होती.

MedPlus health services

ठाण्यातील खोपट या ठिकाणी असलेल्या मेड प्लस हेल्थ सर्विसेसच्या स्टोअरला 15 दिवसांची सस्पेन्शन नोटीस फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन कडून देण्यात आली आहे.

पॉलिसील इरिगेशन सिस्टम

प्रारंभिक किंमत 54 रुपये प्रति शेअर असणारा Polysil Irrigation system IPO शेअर बाजारात 16 फेब्रुवारीला लिस्ट होणार आहे.

Sudarshan chemical Industries

सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजची 2.56% हिस्सेदारी एचडीएफसी म्युचल फंडने खरेदी केली आहे. यासाठी ऍव्हरेज किंमत 513.99 रुपये होती.

Pros and Cons Of IPO For Investor त्याचबरोबर आयपीओ म्हणजे काय?

Scroll to Top