Stocks to watch today: ग्रासिम, एशियन पेंट्स, टाटा कम्युनिकेशन्स, हिरो मोटो कॉर्प, देवयानी इंटरनॅशनल, फेडरल बँक, झी एंटरटेनमेंट

Stocks to watch today: भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदार आणि इंट्राडे ट्रेडर्स दररोज नवनवीन स्टॉकची माहिती घेत असतात. त्यापैकीच काहींमध्ये बातमी असते. हेच ओळखून आम्ही Stocks to watch today अशी दररोज ब्लॉग सिरीज चालू केली आहे. या ठिकाणी तुम्हाला त्या सर्वांची माहिती पूर्णपणे दिली जाईल.

Stocks to watch today

Stocks to watch today

ग्रासिम

Grasim share त्याच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च किमतीवर ट्रेड करत आहे. ही कंपनी त्यांचा पहिला पेंट प्लांट हरियाणाच्या पानिपतमध्ये सुरू करणार आहे.

एशियन पेंट्स

Asian paints साठी आता मोठ आव्हान निर्माण होणार आहे. त्यामुळे या स्टॉक मध्ये काही काळासाठी घसरण पहायला मिळू शकते. ग्रासिम इंडस्ट्रीजने त्यांच्या या मार्केटमध्ये एन्ट्री घेतल्यामुळे मोठी स्पर्धा सुरू होणार आहे.

टाटा कम्युनिकेशन्स

तज्ञांच्या मते, टाटा कम्युनिकेशन्समध्ये 50day Ema चा सपोर्ट आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रेंज तोडून यात उसळी दिसू शकते.

हिरो मोटोकॉर्प

हिरो मोटोकॉर्पच्या Hero Mavrick 440 जानेवारी महिन्यात लॉन्च झाल्यानंतर आता डिलिव्हरी डेट समोर आलेली आहे. 15 एप्रिल 2024 पासून बाईकची डिलिव्हरी सुरू होणार आहे.

देवयानी इंटरनॅशनल

Yum रेस्टॉरंटसने त्यांच्याकडे असलेली देवयानी इंटरनॅशनलची 4.4 टक्के हिस्सेदारी विकून टाकलेली आहे. यातून त्यांना 871 कोटी रुपये मिळणार आहेत.

फेडरल बँक

फेडरल बँकेचे एमडी श्रीनिवासन यांच्या जागी दुसऱ्याची नेमणूक करण्यासाठी शोधाशोध करत आहेत. ही बातमी बाहेर आल्यानंतर 8 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.

झी एंटरटेनमेंट

झी एंटरटेनमेंटचे सुभाष चंद्रा आणि पुनीत गोइंका यांना सेबीकडून दुसरीकडे निधी वळवण्याच्या केस मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. Zee Sony Merger होणार नाही, असेही ग्रुप कडून सांगण्यात येत आहे.

एफडी करण्याचा विचार करताय? या 7 Small finance Bank FD rates देत आहेत 8 टक्के पेक्षा जास्त

Scroll to Top