Stocks in news today: मोठ्या गुंतवणूकदारांचे आणि इंट्राडे मध्ये ट्रेड करणाऱ्या ट्रेडर्सचे लक्ष असणारे स्टॉक्स या विषयीची माहिती येथे भेटणार आहे. यात केपीआयटी, एनएमडीसी, बीपीसीएल, कोल इंडिया, आयआरबी इन्फ्रा आणि टपारिया टूल्स यांच्यावर असलेल्या बातमीचा समावेश असेल.
NMDC Steel Share
एनएमडीसी या PSU Stock चे क्वॉर्टरली रिझल्ट आले आहेत. त्यांचा निव्वळ नफा 62 टक्क्यांनी वाढलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून 5.75 रुपयांचा अंतरिम डिव्हिडेंड जाहीर करण्यात आलेला आहे.
BPCL Stock
कोची एअरपोर्ट जवळ ग्रीन हायड्रोजन प्लांट आणि फ्युलिंग स्टेशन उभारणार आहे. त्याचबरोबर त्याला लागणारी सर्व टेक्नॉलॉजी आणि त्याचे सर्व कामकाज बघणार आहे. BPCL share price सध्या 3 टक्क्यांनी वर आहे.
Coal India
जेफ्रिज या ब्रोकरेज फर्मने सांगितले की, PSU Stocks चे रीरेटिंग करणे आवश्यक आहे आणि ऍव्हरेज रेटिंगपेक्षा सुद्धा जास्त होईल जर सरकारने त्यांची कपॅसिटी वाढवली. Coal India Dividend हा 5.25 रुपयांचा जाहीर करण्यात आलेला आहे. सध्या Coal India share price 2.7% वाढलेली आहे.
IRB infra
तिमाहीच्या निकालानुसार त्यांचा नेट प्रॉफिट ₹187.42 कोटी झालेला आहे. IRB infra share price ही 67.20 रुपये चालू आहे.
Taparia tools
Taparia tools share dividend हा 20 रुपये जाहीर करण्यात आलेला आहे. हा पेनी स्टॉक कायम सर्किटवर बघायला मिळतो. आताही याची किंमत 3.06 चालू आहे आणि तो अप्पर सर्किटवर आहे. त्यामुळे यात सध्या गुंतवणूक करता येणार नाही.
KPIT
केपीआयटी टेक्नॉलॉजीने वार्षिक (year on year) 55% वाढ दर्शवलेली आहे. KPIT dividend हा 2.10 रुपये देण्यात येणार आहे. त्यासाठी रेकॉर्ड डेट 9 फेब्रुवारी 2024 ठेवण्यात आली आहे.
Mtar technology
क्वॉर्टरली रिझल्ट खराब आल्यामुळे Mtar share price 12 टक्क्यांनी घसरली. मागील Q3 च्या तुलनेत निव्वळ नफ्यात 66.8% ची घट झाली आहे.
Mahindra and Mahindra
तिमाहीच्या निकालांमध्ये महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचा नफा 60 टक्क्यांनी वाढलेला आहे. तसेच त्यांच्या महसुलातही 16 टक्क्यांची वाढ दिसली. त्यांचा नीट प्रॉफिट ₹2,454 कोटींवर पोहोचला आहे. त्यामुळे त्यांच्या कंपनीचा स्टॉकने 3 टक्क्यांपेक्षा जास्त उसळी मारली. आता किंमत ₹1700 च्या वर चालू आहे.
Paytm Crisis: आरबीआयनंतर पेटीएमला गुंतवणूकदारांनीही दिला दणका