Stocks in focus: बंधन बँक, IRCTC, टाटा एलेक्सी, एंजल वन, Vi, बजाज ऑटो आणि इतर

Stocks in focus: शेअर मार्केटमध्ये दररोज विविध प्रकारच्या स्टॉक्समध्ये बातम्या असतात. यावर गुंतवणूकदारांचे खूप लक्ष असते. याविषयीची माहिती आपण या लेखात घेणार आहोत. आज बंधन बँक, आयआरसीटीसी, व्होडाफोन आयडिया, टाटा एलेक्सी, एंजल वन, बजाज ऑटो, ओलेक्ट्रा ग्रीनटेक आणि भारत फोर्ज हे Stocks in focus आहेत.

Stocks in focus

बंधन बँक

22 फेब्रुवारीपासून Bandhan Bank च्या सीएफओ पदी राजीव मंत्री यांची नियुक्ती करण्यास बँकेच्या बोर्डाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

आयआरसीटीसी

IRCTC ने ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी फुड्स बरोबर पार्टनरशिप केली आहे. यात ज्या प्री ऑर्डर मिल्स असतील, त्यांची डिलिव्हरी आणि पुरवठा करण्यासाठी आयआरसीटीसीच्या ई-केटरिंग पोर्टल वरून विशाखापटनम, बेंगलोर आणि विजयवाडा या ठिकाणी पहिल्यांदा सेवा सुरू होणार आहे.

व्होडाफोन आयडिया

निधी उभारण्यासाठी व्होडाफोन आयडियाच्या बोर्डाची 27 फेब्रुवारी रोजी मीटिंग होणार आहे. यात विविध पर्यायांबाबत चर्चा केली जाणार आहे.

टाटा एलेक्सी

Tata elxsi ने Accuknox बरोबर 5g नेटवर्कच्या विस्तारासाठी पार्टनरशिप केली आहे. याचबरोबर त्यांना ही पार्टनरशिप भविष्यात येणाऱ्या 6g साठी लागणाऱ्या नेटवर्कच्या तयारीसाठी सुद्धा खूप महत्त्वाची असेल.

एंजल वन

Angel one हे 2,000 कोटी रुपयांपर्यंतचा निधी उभारणार आहे.

बजाज ऑटो

बजाज ऑटो ने YULU बाइक्स या कंपनीत 45.75 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. आता त्यांची ही गुंतवणूक 18.8% पर्यंत पोहोचली आहे.

ओलेक्ट्रा ग्रीनटेक

मुंबईच्या बेस्टकडून 2400 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर आणि त्यांचा सर्व मेंटेनन्स पाहण्याची जबाबदारी Olectra greentech ला मिळालेली आहे. या ऑर्डरची किंमत 4,000 कोटी रुपये असणार आहे.

भारत फोर्ज

Bharat forge ने त्यांची उपकंपनी असलेल्या Bharat Forge global holding मध्ये 133 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे.

Stocks to watch today: ग्रासिम, एशियन पेंट्स, टाटा कम्युनिकेशन्स, हिरो मोटो कॉर्प, देवयानी इंटरनॅशनल, फेडरल बँक, झी एंटरटेनमेंट

Scroll to Top