Busy Bee Airways: स्पाइस जेटचे अजय सिंग आणि बीझी बी एअरवेजने गो फर्स्ट खरेदीसाठी दिली ऑफर

Busy Bee Airways: स्पाइसजेटच्या अजय सिंग यांनी बीझी बी एअरवेज सोबत Go First खरेदी करण्यासाठी बोली लावलेली आहे. अजय सिंग यांनी स्वतःच्या हिमतीवरच ही कामगिरी करण्याचे ठरवले आहे आणि SpiceJet फक्त एका स्ट्रॅटेजिक पार्टनरचा रोल करेल, असे सांगण्यात आले आहे.

Busy Bee Airways सोबत SpiceJet

SpiceJet Ajay Singh Busy Bee Airways go first (1)

या ऑफरमध्ये असे सांगण्यात आले आहे की, SpiceJet फक्त ऑपरेटिंग पार्टनर म्हणून नव्या एअरलाईन साठी काम करेल. यात ते त्यांच्या सर्व सर्विसेस, कौशल्य आणि स्टाफचा वापर करतील. चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्वतःच्या क्षमता वाढवण्यासाठी नवनवीन उपाय केले जातील. Busy Bee Airways यात महत्त्वाची भूमिका बजावेल. Go First हा खूप मौल्यवान ब्रँड आहे आणि त्यांच्याबरोबरच आमची कंपनी उत्कृष्ट काम करणार आहे. हे एव्हिएशन मार्केट खूप मोठे असल्यामुळे दोन्ही कंपन्यांना ग्रोथ करण्याची पुरेपूर संधी भेटेल.

दोन्ही कंपन्यांचे शेड्युल व्यवस्थितरित्या तयार केले जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सेवा लोकांपर्यंत पोहोचवता येणार आहे.

SpiceJet ने केली नोकर कपात

हे डील होण्यासाठी जवळपास 1,400 लोकांना कामावरून काढले जाणार आहे. त्यातून त्यांना वार्षिक 100 कोटी वाचवता येणार आहेत, असे इकॉनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार समजले आहे.

उभारली फंडिंग

त्यांनी आतापर्यंत रीफायनान्सिंग प्लॅनसाठी त्यांनी ₹744 कोटी उभारले आहेत आणि येणाऱ्या काळात त्यांच्याकडे 2,250 कोटी रुपयांचे फ्रेश कॅपिटल सुद्धा असू शकते.

गो फर्स्ट डाउनफॉल

दिवाळखोरीपासून वाचण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता परंतु त्यांना नवीन गुंतवणूकदार न मिळाल्यामुळे कर्जदारांकडून त्यांचे लिक्विडेशन करण्याचा विचार चालू आहे. त्यांच्या कर्जदारांमध्ये मुख्यतः बँक ऑफ बडोदा, ड्यूश बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँक यांचा समावेश आहे.

दुसऱ्या कंपनीने सुद्धा बीड केली

स्पाइस जेट आणि Busy Bee Airways यांच्या बरोबरच Sky One’s या यूएईच्या कंपनीने सुद्धा त्यांची ऑफर दिलेली आहे. त्यांचे चेअरमन जयदीप मिरचंदाणी यांनी सांगितले की, भारतीय एव्हिएशन मार्केट खूप मोठ असल्यामुळे येथे खूप संधी आहेत.

गो फर्स्ट कडून भारतीय कंपन्यांचा विचार करण्यात येईल, असे सूत्रांच्या माहितीवरून कळले आहे. याचे मुख्य कारण भारतीय मार्केटमध्ये त्यांना असलेले ज्ञान आहे. अजय सिंग यांनी ही संधी ओळखल्यामुळे त्यांचीच ऑफर स्वीकारली जाणार असल्याच्या चर्चा आहेत.

स्पाइसजेटच्या शेअर्स मध्ये तेजी

ही बातमी बाहेर पडल्यानंतर त्यांच्या शेअर्समध्ये 11 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. यावरून असे दिसून येते की, गुंतवणूकदारांना त्यांच्यावर खूप विश्वास आहे.

Paytm Fastag Porting करायच आहे का? मग या स्टेप्स फॉलो करा

Scroll to Top