Shark Tank Indian Cast बद्दल पूर्ण माहिती

Shark Tank Indian Cast: भारतात Startup जगतावर आधारित रियालिटी शो रिलीज झालेला आहे. यामध्ये देशातील टॉपच्या कंपन्यांचे संस्थापक एंजल इन्वेस्टर म्हणून जजचे काम करत आहेत. आता या शोचा तिसरा सिझन चालू आहे. यात नवीन जजेसची एन्ट्री झालेली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला येथे पाहायला मिळेल.

सर्व Shark Tank Indian Cast सीजन 3

Shark Tank Indian Cast

जुने जेजेस

पहिल्या सीजन पासून असणारी Shark Tank Indian Cast खालील प्रमाणे आहे:

अनुपम मित्तल

शादी डॉट कॉमचे Anupam Mittal हे पहिल्या एपिसोड पासून या रियालिटी शोमध्ये काम करत आहेत. त्यांचा वार्षिक टर्न ओव्हर ₹15,000 कोटींच्या घरात आहे.

अमन गुप्ता

‘बोट’ कंपनीचे फाउंडर Aman Gupta हे सुद्धा पहिल्यापासून यात काम करत आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात खूप मनोरंजन निर्माण होते.

विनिता सिंग

शुगर कॉस्मेटिक्सची मालकीन विनिता सिंगने दिलेले मार्गदर्शन खूप जणांना आवडते. त्यांचे नेटवर्थ ₹4000 कोटींचे आहे.

नमिता थापर

महाराष्ट्राच्या पुणे येथे स्थायिक असलेल्या नमिता थापर यामुळच्या गुजरात मधील आहेत. त्या Emcure फार्मासिटिकलच्या सीईओ आहेत. इंटरनेटवर त्यांच्या ‘I Am Out’ या वाक्यावर खूप मीम्स व्हायरल झालेल्या आहेत.

पियुष बन्सल

लेन्सकार्ट या आयवेअर ब्रँडचे संस्थापक Piyush Bansal सुद्धा यात आहेत. कितीही मोठी डील असली तरी ते एकट्याने करतात.

अमित जैन

कार देखोचे फाउंडर अमित जैन यांना दुसऱ्या सीजन मध्ये घेण्यात आले होते.

नवीन जजेस

अजहर इक्बाल

60 शब्दांच्या न्यूज अँपची स्थापना करून मिलियन डॉलर कंपनी बनवणारे अजहर इक्बाल हे नवीन जज म्हणून घेण्यात आले आहेत. 2013 मध्ये स्वतःच्या दोन मित्रांसोबत एका फेसबुक पेज पासून त्यांच्या कंपनीची सुरुवात झाली होती.

राधिका गुप्ता

एडलवाइज म्युचल फंडच्या सीईओ राधिका गुप्ता या नव्या Shark Tank Indian Cast आहेत. त्यांच्या बारीक निरीक्षणामुळे एपिसोड बघण्यामधून खूप काही शिकायला भेटतं.

रॉनी स्क्रूवाला

Upgrad या ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्मची सुरुवात रॉनी स्क्रूवाला यांनी 2015 मध्ये केली होती. त्यांनाही येथे संधी देण्यात आलेली आहे. या प्लॅटफॉर्मवरील ते सर्वात वयस्कर बिझनेसमन आहेत.

दीपिंदर गोयल

Zomato चे सीईओ दीपिंदर गोयल तिखट शब्दांत उत्तम सल्ला देण्यासाठी ओळखले जातात. त्यांची उद्योजकांवरील प्रतिक्रिया पाहण्यात खूप मजा येते.

रितेश अग्रवाल

सर्वात तरुण अब्जाधीश या शोमध्ये OYO चे रितेश अग्रवाल आहेत. त्यांचा शांत स्वभाव सर्वांना खूप आवडतो.

वरून दुआ

Acko general Insurance चे वरून दुआ हे सुद्धा काही एपिसोड मध्ये दिसणार आहेत.

शार्क टँक इंडियाचे हे जजेस स्वतःच आहेत तोट्यात?

Scroll to Top