शार्क टँक इंडियाचे हे जजेस स्वतःच आहेत तोट्यात?

पहिल्या सीजन पासूनच सर्वांच्या आवडीचा असलेला शार्क टँक इंडियाचा आता तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. यात काही नवीन परीक्षकांची एन्ट्री झालेली आहे. भारतीय तरुणांमध्ये चित्रपट पाहण्यापेक्षा आता हा शो बघण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. या शोमध्ये भारतातील स्टार्टअप फाउंडर गुंतवणूक मागण्यासाठी येतात. त्यावेळी त्या बिजनेसची सर्व माहिती घेऊन आवडल्यास हे जजेस त्यामध्ये गुंतवणूक करतात.

पहिला सीजन काश्नीर ग्रोवरच्या तिखट प्रतिक्रियांसाठी खूप गाजला होता. या तिखट प्रतिक्रियांमुळेच त्याला दुसऱ्या भागात काढून टाकले होते आणि त्या जागी कार देखोच्या अमित जैनला संधी देण्यात आली होती. तेव्हा त्यात परीक्षक म्हणून गझल अलग, अनुपम मित्तल, अमन गुप्ता, नमिता थापर, विनिता सिंग आणि पियुष गोयल होते. आता या शोचा तिसरा सीजन आलेला आहे. शार्क टँक इंडिया सीझन 3 मध्ये ओयोचे फाउंडर रितेश अग्रवाल, झोमॅटोचे दिपिंदर गोयल, इनशॉर्टचे अजहर इक्बाल, एडलवाईस म्युच्युअल फंडची फाउंडर राधिका गुप्ता हे काही एपिसोड मध्ये दिसलेले आहेत. त्याचबरोबर वरून दुआ आणि रॉनी स्क्रूवाला देखील येणाऱ्या एपिसोडमध्ये दिसतील, असे मीडिया रिपोर्ट वरून समजले आहे.

शार्क टँक इंडिया shark tank india season 3

शार्क टँक इंडियामध्ये तोट्यात आणि नफ्यात असणारे परीक्षक

हे सर्व आकडे आर्थिक वर्ष 2022-23 मधील आहेत.

तोट्यात असणारे परीक्षक

• रितेश अग्रवाल:- मागील वर्षी 5,464 कोटी रुपयांचा महसूल जमा केला होता, परंतु ते सध्या 1,287 कोटी रुपयांच्या तोट्यात आहेत.

• रॉनी स्क्रूवाला:- अपग्रॅडचा रेवेन्यू 1,142 कोटी रुपये आहे आणि तोटा 1,194 कोटी रुपये आहे.

• दिपिंदर गोयल:- हे झोमॅटोचे सीईओ आहेत. त्यांचा 7,079 कोटी रुपयांचा महसूल असून 971 कोटी रुपयांचा तोटा आहे.

• वरुण दुआ:- ॲको इन्शुरन्सने 1,758 कोटी रुपयांचा महसूल केला होता आणि त्यांना 738 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

• अमित जैन:- कार देखोचा तोटा 562 कोटी रुपये असून 2,331 कोटी रुपये त्यांनी महसूल गोळा केला होता.

• अझहर इक्बाल:- इनशॉर्टसचा 309.75 कोटी रुपये तोटा असून 180.90 चा महसूल आहे.

• अमन गुप्ता :- बोटला मागील वर्षी 129.4 कोटी रुपये तोटा झाला होता आणि त्यांनी 3,377 कोटी रुपयांचा महसूल गोळा केला होता.

• विनिता सिंग:- शुगर कॉस्मेटिक्सला 76 कोटी रुपयांचा तोटा आणि त्यांचा 420 कोटी रुपये महसूल होता.

शॉर्ट टॅंक इंडिया मधील नफ्यात असणारे जजेस

• पियुष बन्सल:- लेन्सकार्टचा 260 कोटी रुपयांचा नफा आणि 3,780 कोटी रुपयांचा महसूल होता.

• नमिता थापर:- Emcure फार्मासिटिकल्सने मागील वर्षात 160 कोटी रुपयांचा नफा दाखवला होता आणि त्यांचा रेव्हेन्यू 3,107 कोटी रुपयांचा होता.

• राधिका गुप्ता:- एडलवाईस म्युचल फंडने 216 कोटी रुपयांचा महसूल करून 17.7 कोटी रुपयांचा नफा दाखवला होता.

यामध्ये अनुपम मित्तल यांच्या बद्दल माहिती दिलेली नाही, कारण त्यांनी ही माहिती गुपित ठेवने पसंत केले आहे. शार्क टँक इंडियाच्या सर्व परीक्षकांमध्ये फक्त तीनच नफ्यामध्ये आणि बाकीचे तोट्यात आहेत.

Ola valuation तब्बल 30 टक्क्यांनी कमी केले या अमेरिकन कंपनीने

Scroll to Top