Azim Premji Wipro News: अझीम प्रेमजी यांनी 1 कोटींपेक्षा जास्त विप्रोचे शेअर्स त्यांच्या दोन मुलांना दिले

Azim Premji Wipro News: विप्रो कंपनीचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी त्यांच्या जवळचे 1 कोटी विप्रोचे शेअर्स त्यांची मुले रिशाद प्रेमजी आणि तारीक प्रेमजी यांच्या नावावर केले आहेत. विप्रोकडून एक्सचेंजला दिलेल्या माहितीत सांगण्यात आले आहे की, हे शेअर्स गिफ्ट स्वरूपात दिलेले आहेत. आम्ही या ठिकाणी तुम्हाला Azim Premji Wipro News बद्दल सविस्तर माहिती देऊ

Azim Premji Wipro News अशी आहे

विप्रो कंपनीची स्थापना अझीम प्रेमजी यांनी केली होती. आयटी इंडस्ट्रीमधील दिग्गज म्हणून ओळखले जाणारे रिशाद प्रेमजी हे सध्या कंपनीचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन आहेत. एक्सचेंजला दिलेल्या माहितीमधून Wipro कडून सांगण्यात आले आहे की, “मी, अझीम एच प्रेमजी माझ्या स्टेकमधले 1,02,30,180 एवढे इक्विटी शेअर्स जे 0.20 टक्के आहेत, ते रिशाद आणि तारीक अझीम प्रेमजी यांना गिफ्ट स्वरूपात देत आहे”. यानंतर मुलांनीही एक्सचेंजला सांगितले की, आम्हाला प्रत्येकी 51 लाख विप्रोचे इक्विटी शेअर्स भेट स्वरूपात प्राप्त झाले आहेत.

Azim Premji Wipro News

प्रमोटर होल्डिंग

0.20% शेअर्स जरी ट्रान्सफर झालेले असले तरी प्रमोटरच्या होल्डिंग मध्ये फारसा बदल दिसत नाही. यामुळे प्रमोटरची कंपनीमधील हिस्सेदारीवर जास्त फरक पडत नाही. या ट्रान्सफर नंतर कंपनीच्या संस्थापकाची हिस्सेदारी 4.3% झाली आहे आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा 0.3 टक्के वाटा कंपनीमध्ये झाला आहे.

या सर्व शेअर्सची किंमत

या 1,02,30,180 स्टॉक्सची किंमत 483 कोटी रुपये होते. ही किंमत आता सध्या स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करत असलेल्या Wipro Share च्या किमतीवरून काढलेली आहे. सध्या या स्टॉकची किंमत 472.9 रुपये चालू आहे.

मागील काही दिवसांमध्ये तुफान तेजी

मागील आठवड्यामध्ये कंपनीच्या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागलेले पाहायला मिळाले होते. त्यादिवशी जवळपास दहा टक्क्यांची उसळी त्याने मारली होती. या ट्रान्सफरमुळे त्यात काही उसळी पाहायला मिळालेली नाही. हा शेअर दिवसभर एकाच जागी स्थिर राहिला. गुंतवणूकदारांसाठी या कंपनीने मल्टीबॅगर रिटर्न्स दिलेले आहेत. यामुळे कंपनीवर गुंतवणूकदारांचा खूप विश्वास आहे. याचे रिझल्ट सुद्धा मागील रिझल्टच्या तुलनेत चांगले आले होते. त्यांच्या मोठ्या मुलाला आयटी इंडस्ट्रीतील दिग्गज म्हणून ओळखले जाते. त्याचा कंपनीला मोठा फायदाच होणार आहे, हे गुंतवणूकदारांना ठाऊक आहे. सर्वच आयटी कंपन्या अलीकडील काही दिवसांमध्ये खर्च कमी करण्यासाठी नोकरकपात करत आहेत.

या Azim Premji Wipro News मधून तुम्हाला नक्कीच माहिती मिळाली असेल, अशी आम्ही आशा करतो.

Air India Airbus A350: एअर इंडियाच्या एअरबसने भरले उड्डाण, आता पुन्हा एकदा बनणार महाराजा!

Comments are closed.

Scroll to Top