RVNL Share News: रेल विकास निगम लिमिटेडच्या स्टॉक मध्ये बजेट अगोदरच्या दिवसांमध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आता त्यानंतर हा शेअर दर दिवसाला पाच टक्क्यांपेक्षा जास्तने पडतो आहे. देशाच्या आर्थिक बजेटमध्ये गुंतवणूकदारांना अपेक्षा होती की, रेल्वेसाठी काही खास तरतूद केलेली असेल. परंतु यात काही विशेष योजना दिसल्या नाहीत, त्यामुळे थोडीशी नाराजीचे वातावरण इन्वेस्टर्समध्ये पसरले आहे.
RVNL Share पडण्याची कारणे आणि इतर माहिती
RVNL Share पडण्याची कारणे
रेल विकास निगम लिमिटेडने त्यांच्या जाहीर केलेल्या Q3 रिझल्टमध्ये नफ्यात 6.2% वार्षिक घट पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या महसुलात सुद्धा 6.4 टक्क्यांची आणि EBITDA मध्ये 9.6% ची घट झालेली आहे. नफा ₹382.4 कोटींवरुन ₹358.6 कोटी झाला आहे. महसूल ₹5,012.1 कोटींवरून ₹4,689.3 कोटींवर घसरला आहे. EBITDA मध्ये ₹26.5 कोटींची घसरण दिसून आली आहे. कंपनी जरी प्रॉफिटमध्ये असली तरी त्यात तूट झालेली आहे.
आता अशी आहे शेअरची अवस्था
बजेट नंतर RVNL आज पर्यंत सत्तावीस टक्क्यांनी कोसळलेला आहे. त्यादिवशी त्याने 318 रुपयांची उच्चांकी किंमत गाठल्यानंतर त्यात पडझड पाहायला मिळाली होती. तेव्हापासून तो खालीच येत आहे. RVNL Share हा 12 फेब्रुवारी रोजी तब्बल 10 टक्क्यांनी घसरलेला आहे. त्यानंतर त्यात थोडी रिकव्हरी झाली आणि 240 रुपयांच्या किमतीवर तो स्थिरावलेला दिसला होता. तज्ञांच्या मते, त्यात आता गुंतवणूक करणे धोक्याचे असेल. हे सेलिंग प्रेशर कमी झाल्यानंतर यात गुंतवणूक करण्याच्या विचार केला जाऊ शकतो, परंतु तोपर्यंत नाही.
रेल्वेतील इतरही स्टॉक्समध्ये पडझड
रेल विकास निगम बरोबरच रेलटेल, आयआरएफसी, IRCTC आणि RITES या स्टॉक्समध्ये सुद्धा सेलिंग पाहायला मिळाली. यापूर्वी यांच्यामध्ये खूप तेजी होती. गुंतवणूकदारांना डबल आणि ट्रिपल रिटर्न सुद्धा यांनी दिलेले आहेत. खऱ्या अर्थाने रिटेल गुंतवणूकदारांसाठी हे PSU stocks मल्टीबॅगर बनलेले आहेत.
तज्ञांच्या मते, ही विक्री तात्पुरत्या स्वरूपाची असेल, कारण इन्वेस्टर त्यांची प्रॉफिट बुकिंग करत आहेत. यानंतर पुन्हा एकदा आपल्याला यात चांगली वाढ पाहायला मिळेल. भारतीय रेल्वे ही कायमच नफ्यात असणारी सरकारची कंपनी आहे. त्यामुळे यात नक्कीच फायदा आहे. थोडेसे रिझल्ट खराब आल्यामुळे हा बदल आपल्याला दिसतो आहे. येणाऱ्या काळात हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे राहील की, यांच्यामध्ये कशा प्रकारची रिकव्हरी चार्टवर दिसेल.
Zydus Lifesciences Buyback होणार 600 कोटी रुपयांचे