RBI monetary policy: RBI कडून Repo Rate मध्ये कुठलाही बदल नाही

8 डिसेंबर रोजी 2024 मधली पहिली RBI Monetary policy जाहीर करण्यात आली. यात रेपो रेट मध्ये कुठलाही बदल करण्यात आला नाही. RBI Repo Rate हा 6.5 टक्क्यांवरच ठेवण्यात आलेला आहे. सहाव्यांदा यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. MPC (monetary policy decision) मुळे भारतीय रुपयामध्ये वाढ बघायला मिळाली.

RBI monetary policy वर गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे म्हणणे

RBI monetary policy RBI Repo Rate

Rbi Repo Rate

शक्तिकांत दास यांनी म्हटले की, भारतीय अर्थव्यवस्था चांगली प्रगती करत आहे. इतर देशांची इकॉनोमी खडतर रस्त्यांवर असताना भारत मजबूत स्थितीत उभा आहे. आम्ही कुठल्याही प्रकारची रेपो दरामध्ये (Rbi Repo Rate) वाढ करणार नाही.

जीडीपी वाढ

पुढे त्यांनी म्हटले की, तज्ञांनी केलेल्या अंदाजापेक्षा आपल्या विकासाच्या वाढीचा वेग अत्यंत चांगला आहे. FY24-25 साठी जीडीपी वाढीचा अंदाज सात टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या अंदाजानुसार GDP वाढ क्वार्टर 1 मध्ये 7.2%, क्वार्टर 2 मध्ये 6.8%, क्वार्टर 3 मध्ये 7% आणि क्वार्टर 4 मध्ये 6.9% असेल.

भारतातील इन्फ्लेशन काहीशे कमी होण्याचे संकेत त्यांनी दिले. दुसऱ्या देशांबरोबर व्यापारामध्ये सध्या वाढ दिसत नाही, परंतु येणाऱ्या या फायनान्शिअल इयरमध्ये त्यात नक्कीच वाढ पहायला मिळेल.

इन्फ्लेशन

RBI monetary policy मध्ये शक्तिकांत दास यांनी सांगितले की, FY25 मध्ये इन्फ्लेशन 5.4 टक्क्यांवरून 4.5% होणार आहे. जवळपास 1% ने आपल्याला इन्फ्लेशन कमी झालेले दिसेल. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये मागणीत वाढ पाहायला मिळत आहे आणि शहरातील लोकांचे वस्तू वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. Consumer price inflation चे टारगेट अजून 4% पर्यंत साध्य झालेले नाही, असेही दास म्हणाले.

जिओ-पॉलिटिकल समस्या

जिओ-पॉलिटिकल समस्या वाढताना दिसत आहेत. याचा परिणाम म्हणून कमोडिटीच्या किमतींमध्ये खूप बदल दिसतो आहे. क्रूड ऑइलच्या किमतीवर याचा जास्त प्रभाव आहे. सतत चालणारी युद्ध यामुळे इन्फ्लेशनला पोषक वातावरण निर्माण झाले आहे, असे रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले.

फॉरेक्स रिझर्व

भारताचे फॉरेक्स रिझर्व $622.5 बिलियनवर पोहोचले आहेत. त्यामुळे आपल्यासाठी आता चिंतेची बाब नाही.

RBI monetary policy मध्ये हे सर्व महत्त्वाचे मुद्दे सांगण्यात आले. रेपो दर स्थिर ठेवल्यामुळे सामान्यांना खूप दिलासा मिळालेला आहे. यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढणार नाही.

खुशखबर! पेटीएमचे तब्बल 50 लाख शेअर्स खरेदी केले या कंपनीने

FAQ

  1. रेपो रेट म्हणजे काय?

    भारताची सेंट्रल बँक इतर बँकांना व्याज दराने पैसे देते त्याला रेपो रेट म्हणतात

1 thought on “RBI monetary policy: RBI कडून Repo Rate मध्ये कुठलाही बदल नाही”

  1. Pingback: Gautam Adani net worth पोहोचली $100 बिलियन - Nationdaily.in

Comments are closed.

Scroll to Top