RBI HDFC Bank News ने इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये खळबळ

RBI HDFC Bank News

भारतातील सर्वात मोठ्या खाजगी कर्जदाराने RBI ला इंडसइंड बँकेमध्ये 9.50% हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी अर्ज केला होता. यावर एचडीएफसी ग्रुपला आरबीआयकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. या सर्व प्रक्रियेची मुदत एक वर्ष ठेवण्यात आली आहे. एका वर्षात जर ही पूर्तता करण्यास बँकेकडून उशीर झाला, तर हे सर्व रद्द करण्यात येईल. फायलिंगमध्ये सांगितल्यानुसार, मतदानाचे हक्क किंवा शेअर कॅपिटल मिळवण्यासाठी ही मंजुरी देण्यात आलेली आहे.

अशी आहे सविस्तर RBI HDFC Bank बातमी

RBI HDFC Bank ला पत्राद्वारे सुचित केले की, तुमचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. तुम्ही पुढील प्रक्रिया सुरू करू शकता.

आरबीआय ने अशी केली सूचना

यांनी सांगितल्यानुसार, एका वर्षामध्ये 9.50% शेअर्स खरेदी केले पाहिजेत. 5 फेब्रुवारी 2024 पासून याची सुरुवात होईल. ही ॲग्रीगेट होल्डिंग 9.50% पेक्षा जास्त वाढवता येणार नाही. दिलेल्या टाईम पिरियडमध्ये हे पूर्ण न केल्यास ही मान्यता रद्द केली जाईल.

RBI HDFC Bank News

या ग्रुपकडे आधीच आहे एवढी इक्विटी

एचडीएफसी पेन्शन आणि एचडीएफसी म्युचल फंडकडे अनुक्रमे 1.88% आणि 2.43% IndusInd मध्ये होल्डिंग आहे.

अशी होणार प्रक्रिया

सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून हे केले जाणार आहे. 9.50 टक्क्यांपर्यंतच खरेदी करता येणार आहे. यात जर 5% पेक्षा कमतरता झाली, तर ते वाढवण्यासाठी पुन्हा मंजुरी घ्यावी लागेल.

एलआयसी ने आधी केली हिस्सेदारी खरेदी

यापूर्वी देशाच्या सर्वात मोठ्या खाजगी कर्जदाराने RBI च्या आदेशाने LIC ने जवळपास 9.99% शेअरहोल्डिंग खरेदी केली आहे. यातही एलआयसीला एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे आणि 9.99% च्या वरती खरेदीसाठी त्यांना सुद्धा मनाई करण्यात आली आहे.

स्टॉकमधील बदल

RBI HDFC Bank News नंतर दोन्ही स्टॉक गॅपअप ओपन झाले. त्यानंतर मात्र त्यांच्यात काहीशी घसरण पाहायला मिळाली. सकाळी इंडसइंडचा स्टॉक 1550 वर ओपन होऊन 10.30 पर्यंत 1520 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करताना दिसला आणि HDFC साईडवेज होती. बँक निफ्टीत पहिल्या सेशनमध्ये काहीशी घसरण दिसली. बजेट नंतर या सेक्टरमध्ये खूप बदल पाहायला मिळत आहेत. भारताला सर्वात मोठी इकॉनॉमी बनवायचे ध्येय समोर ठेवल्यामुळे हे बदल चांगले आहेत, असे तज्ञांकडून सांगितले जात आहे.

खुशखबर! पेटीएमचे तब्बल 50 लाख शेअर्स खरेदी केले या कंपनीने

Scroll to Top