Rbi Fine On SBI: आरबीआयने एसबीआय सोबत इतर 2 बँकांना ठोठावला दंड

Rbi Fine On SBI: रिझर्व बँक ऑफ इंडियाने भारताची सर्वात मोठी पीएसयु सेक्टर मधील बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाला 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे. त्याचबरोबर कॅनरा आणि सिटी युनियन बँकवरही दंडाची कारवाई करण्यात आलेली आहे. या तिन्हींवरील रक्कम मिळून तीन कोटींच्या जवळपास आहे.

एसबीआय आणि इतर बँकावरील कारवाईची माहिती

RBI Fine On SBI penalty on canara bank and city union (1)

Rbi Fine On SBI ची कारणे

एसबीआय वरील कारवाई ही डिपॉझिटर एज्युकेशन अवेअरनेस फंड स्कीम 2014 शी निगडित असणाऱ्या काही नियमांचे पालन करण्यात ते निष्फळ ठरल्यामुळे झाली आहे. या दंडाची रक्कम तब्बल 2 कोटी रुपये (Rbi Fine On SBI) आहे. ही बातमी बाहेर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या शेअर्स मध्ये घसरण झाली आहे. स्टॉक मार्केटच्या पहिल्या सेशनमध्ये दिवसाच्या सर्वोच्च किमती पासून 1.20 टक्क्यांची पडझड निदर्शनास आली. भारतातील सर्वात विश्वासू म्हणून त्यांची ओळख असल्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.

कॅनरा बँकेवरील दंड

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, ‘क्रेडिट माहिती कंपन्यांना क्रेडिट माहिती प्रदान करण्यासाठी डेटा फॉरमॅट आणि इतर नियमक उपाय’ याविषयी काही नियम जारी करण्यात आले होते. या नियमांचे त्यांच्याकडून पालन करण्यात निष्काळजीपणा समोर आल्यामुळे 32.30 लाख रुपयांचा दंड त्यांना करण्यात आलेला आहे. CIC ने नाकारलेला सर्व डेटा सात दिवसांच्या मुदती अगोदर सुधारणे गरजेचे होते, परंतु त्यांनी ते केले नाही. त्याचबरोबर क्रेडिट माहिती अपलोड करण्यात सुद्धा त्यांना यश प्राप्त झाले नाही. हे सर्व विचारात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सिटी युनियन बँक वरील कारवाई

Rbi Fine On SBI आणि कॅनरा बँकेवर झाल्यानंतर सिटी युनियन वरही कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्या नॉन परफॉर्मिंग असेटच्या नोंदीत आणि आरबीआयला दिलेल्या माहितीत फरक असल्याचे जाणवल्यानंतर 66 लाख रुपयांची पेनल्टी लावण्यात आलेली आहे.

आरबीआयने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मागील काही दिवसांपासून कारवाईचा धडाका सुरू केलेला आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच संस्था बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पेटीएमवरील कारवाई सर्वात मोठी मानली जात आहे. अशातच विजय शेखर शर्मा यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ITC Prataap Snacks News: आयटीसीचा शेअर असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Scroll to Top