Pros and Cons Of IPO For Investor|आयपीओ म्हणजे काय?

भारतीय शेअर बाजारात आजकाल नवीन कंपन्या येत आहेत. त्यामध्ये बरेचसे गुंतवणूकदार कमी काळात जास्त परतावा मिळवण्यासाठी त्यांचे नशीब आजमावत असतात. बऱ्याच जणांना निराशेचा सामना करावा लागतो. काहींना कमी कालावधीत जास्त पैसे सुद्धा भेटतात. याउलट जर लिस्टिंगच्या दिवशी स्टॉकची विक्री करण्याअगोदर तो खाली कोसळला तर काहींना तोटा सुद्धा घ्यावा लागतो. तर अशाच गुंतवणूकदाराला होणाऱ्या फायद्या आणि तोट्यांबद्दल (Pros and Cons Of IPO For Investor) आणि नक्की आयपीओ म्हणजे काय? याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला या लेखात नक्कीच भेटेल.

आयपीओ म्हणजे काय आणि Pros and Cons Of IPO For Investor

Pros and Cons Of IPO For Investor आयपीओ म्हणजे काय

आयपीओ म्हणजे काय?

आयपीओ म्हणजे एखादी खाजगी कंपनी त्यांच्या हिस्स्यातून काही शेअर्स पहिल्यांदाच लोकांना ऑफर करते आणि ट्रेड करण्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये एक सार्वजनिक कंपनी बनते. या प्रक्रियेत कंपनीचे नवीन किंवा जुन्या गुंतवणूकदारांकडे असलेले शेअर्स लोकांना विकले जातात. याचे मुख्य उद्दिष्ट पैसे उभारून कंपनीची वाढ आणि विस्तार करणे असते. एकदा ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्टॉक एक्सचेंजवर सहज शेअर्सची खरेदी किंवा विक्री करता येऊ शकते.

Pros and Cons Of IPO For Investor

इन्व्हेस्टरसाठी गुंतवणूक करण्याचे फायदे आणि तोटे पुढील प्रमाणे आहेत:

फायदे (pros)

ग्रोथ पोटेन्शिअल

कंपनी नवीन आणि भविष्यातील मागणीचा विचार करणारी असेल तर त्यात परतावा जास्त भेटू शकतो.

लिक्विडिटी

स्टॉक एक्सचेंजवर आल्यानंतर गुंतवणूकदाराला शेअर्सची सहजरित्या खरेदी किंवा विक्री करता येऊ शकते.

पारदर्शकता

लिस्ट झाल्यानंतर कंपनीला त्यांच्या फायनान्शियल बद्दल सर्व माहिती दर तीन महिन्याला सांगणे गरजेचे असते. त्यामुळे आयपीओमध्ये पैसे गुंतवल्यानंतर पारदर्शकता अनुभवता येते.

कमी वेळात जास्त रिटर्न्स

हा सर्वात मोठा फायदा आहे. अलॉटमेंट भेटल्यानंतर चांगल्या किमतीत लिस्टिंग जर झाली तर कमी वेळात चांगले रिटर्न भेटू शकतात.

कमी किंमत

नवीन असल्यामुळे जास्त प्रगती करण्याअगोदर गुंतवणूकदाराला त्यात इन्वेस्ट करण्याची संधी भेटते. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांची जशी प्रगती होईल तशी आपल्या पैशांची वाढ होते.

तोटे (Cons)

व्होलाटीलिटी

स्टॉक मार्केटमध्ये आल्यानंतर पहिल्या काही दिवसांमध्ये किंमत खूप वर खाली होताना दिसते. त्यामुळे कमी काळासाठी गुंतवणाऱ्यांना खूप भीती वाटते.

कमी माहिती

लिस्ट होण्याअगोदरची माहिती ही अगदी कमी प्रमाणात असल्यामुळे त्यात इन्वेस्ट करणे धोक्याचे असू शकते.

प्रचार

कंपनी फंडामेंटली मजबूत नसतानाही तिचा प्रचार जास्त केला जातो. त्यामुळे बरेच जण यात फसतात आणि त्यांना तोटा घ्यावा लागतो.

लॉकअप पीरियड्स

लिस्ट झाल्यानंतर काही काळ जुन्या गुंतवणूकदारांना त्यांची हिस्सेदारी विकता येत नाही. परंतु तो काळ संपल्यानंतर त्यांनी विक्री केल्यास क्रॅश येऊ शकतो.

Pros and Cons Of IPO For Investor जाणून घेणे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण यातूनच पुढील दिशा ठरवता येते आणि पावले योग्य जागी पडतात. चांगली माहिती असणे कधीही चांगले असते. त्यामुळे स्वतःचा निर्णय तुम्ही तुमच्या फायनान्शिअल ॲडव्हायझरच्या सल्ल्याने तुम्ही निर्णय घेऊ शकता.

Scroll to Top