वयाच्या 27 व्या वर्षी Youngest billionaire in India बनला पर्ल कपूर

झीरोधाचे सहसंस्थापक नितीन कामत यांच्याकडे असलेला youngest billionaire in India चा किताब आता 27 वर्षीय पर्ल कपूरकडे आलेला आहे. नितीन कामत वयाच्या 37 व्या वर्षी अब्जाधीश झाले होते. परंतु त्यांचा हा रेकॉर्ड आता मोडलेला आहे.

पर्ल कपूर या Youngest billionaire in India बद्दल सर्व माहिती

Youngest billionaire in India pearl kapur 1

कोण आहे Pearl Kapur?

Pearl Kapur Zyber 365 चे संस्थापक आणि सीईओ आहेत. मे 2023 मध्ये त्यांना या कंपनीची स्थापना केली होती. त्यांचे मुख्यालय जरी लंडनमध्ये असले तरी त्यांची सर्व कामे गुजरातमधील अहमदाबाद मधून चालतात. एका वर्षाच्या आत ते बिलीनियर झाले आहेत. हा Web3 स्टार्टअप सायबर सिक्युरिटी, एआय आणि ब्लॉकचैन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात एक मोठा ब्रँड झाला आहे. Zyber 365 ची 90 टक्के हिस्सेदारी पर्ल कपूर यांच्याकडे आहे. $1.2 बिलियनचं व्हॅल्युएशन असणारा हा आशियातील सर्वात जास्त ग्रोईंग युनिकॉर्न म्हणून ओळखला जातो आहे.

त्यांचे शिक्षण

क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मधून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे. इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये त्यांनी एमएससी केली आहे. शिक्षणानंतर त्यांनी त्यांच्या व्यवसायिक जीवनाला सुरुवात केली.

Pearl Kapur Networth

कंपनीची 90% हिस्सेदारी त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांची नेटवर्थ $1.1 बिलियन आहे. कमी कालावधीत एवढी जास्त प्रगती केल्यामुळे त्यांच्या लीडरशिपचा हा खूप मोठा उदय आहे. या सेक्टरमधील कंपनीची ग्रोथ पाहून Sram आणि Mram ग्रुपने टप्प्याटप्प्याने तब्बल $100 मिलियनची इन्व्हेस्टमेंट Zyber 365 मध्ये केलेली आहे. त्यानंतर काही काळातच पर्ल कपूर हे Youngest Billionaire in India झाले.

त्यांचा आधीचा काळ आणि भविष्यातील योजना

Zyber 365 हा स्टार्टअप उभा करण्यापूर्वी त्यांनी बिझनेस ॲडव्हायझर म्हणून अँटीअर सोल्युशन्ससाठी आणि AMPM स्टोअरसाठी फायनान्शिअल ॲडव्हायझर म्हणून काम केले आहे. 2022 मध्ये त्यांनी ‘बिलियन पे टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडची’ सुद्धा स्थापना केली होती.

भविष्यामधील गोष्टींविषयी ते सांगतात की, जग हे जलद गतीने टेक्नॉलॉजीच्या दिशेने झेप घेत आहे. सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचैन आणि एआय यांच्यामुळे ग्लोबलायझेशन 3.0 ची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे येणारा काळ हा आमच्यासाठी खूप चांगला असणार आहे.

youngest billionaire in India बनण्यासाठी वयाची अट नसते, हे त्यांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे अनेक नवउद्योजकांना यातून प्रेरणा भेटली आहे. स्वतःवरील विश्वास आणि या प्रवासात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची क्षमता हेच Entrepreneur ला चांगला बिझनेस वाढवण्यासाठी मदत करतात.

Scroll to Top