Paytm Crisis: आरबीआयनंतर पेटीएमला गुंतवणूकदारांनीही दिला दणका

Paytm Crisis: काही दिवसांपूर्वीच पेटीएम पेमेंट बँकवर (PPB) आरबीआयकडून निर्बंध घालण्यात आले होते. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. एवढे होऊनही अमेरिकेच्या मॉर्गन स्टॅन्ले या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने मोठी गुंतवणूक केली होती. भारतीय शेअर बाजारांमध्ये त्यांचा स्टॉक दिवसेंदिवस पडत आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदारांचाही त्यांच्यावरून विश्वास उडालेला दिसतोय.

Paytm Crisis Explained

प्रथम 31 जानेवारीला आरबीआयने PPB वर (RBI Paytm payments Bank) आर्थिक फेरफार केल्याप्रकरणी निर्बंध लावले. रिझर्व बँक ऑफ इंडियाला दिसून आले की, एकच पॅन कार्ड 100 पेक्षा जास्त लोकांना लिंक आहे आणि अशाही काही केसेस होत्या की ज्यात ही संख्या हजारांवर होती. यातून जे व्यवहार व्हायचे ते कोटींच्या घरात होते. यावरून त्यांना लक्षात आले की यात मनी लाँडरींगची शक्यता असू शकते. त्यामुळे रेगुलेटरने PPB ला त्यांचे सर्व कामकाज बंद करण्याचे आदेश दिले. आता अशी बातमी समोर आली आहे की, यापुढे यात कुठलाही बदल केला जाणार नाही. त्यानंतर त्यांच्या शेअर्समध्ये तुफान क्रॅश पाहायला मिळाला.

Paytm crisis Paytm payment bank

एवढे झाल्यानंतरही अमेरिकेच्या मॉर्गन स्टॅन्ले या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने गुंतवणूक करण्याचे धाडस दाखवले. मार्केटमधील तज्ञांकडून यावर प्रतिक्रिया आली की, ही असेट मॅनेजमेंट कंपनी बॉटम फिशिंग करण्याचा प्रयत्न करत आहे.

काही फॉरेन ब्रोकरेज फर्मसने Paytm Crisis झाल्यानंतर त्यांचे टार्गेट 60 टक्क्यांनी कमी केलेले आहेत. याचा परिणाम स्टॉक वर दिसून येत आहे.

शेअर्समध्ये होणारी घसरण

बातमी आल्यानंतर सलग तीन दिवस हा स्टॉक लोअर सर्किटवर होता. मॉर्गन स्टॅन्ले कंपनीच्या गुंतवणुकीची बातमी बाहेर आल्यानंतर सात जानेवारी रोजी यात अप्पर सर्किट सुद्धा पाहायला मिळाले. मात्र दुसऱ्याच दिवशी शेवटच्या सेशनमध्ये पुन्हा लोअर सर्किट लागले होते. आता हा शेअर 350 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. Paytm Crisis ची बातमी आल्यापासून 7 टक्क्यांनी हा स्टॉक कोसळलेला आहे. आयपीओ आल्यानंतर ही त्याची सर्वात नीचांकी किंमत आहे.

UPI

त्यांच्या यूपीआय सेवेवर कुठलेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे याचा वापर करणाऱ्या व्यक्तींना चिंता करण्याची गरज नाही. ही सेवा सुरळीतपणे चालू राहणार आहे. हे निर्बंध फक्त त्यांच्या Paytm payments Bank वर घालण्यात आलेले आहेत. कंपनीकडून सुद्धा यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे की, ग्राहकांनी घाबरण्याचे कारण नाही आणि UPI सेवेचा वापर थांबवू नये.

Scroll to Top