Pakistan GDP Vs Tata Group: रतन टाटांनी पाकिस्तानला केले चितपट!

Pakistan GDP Vs Tata Group: पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. 341 बिलियन डॉलरचा पाकिस्तानचा जीडीपी आहे, असे आयएमएफच्या अहवालानुसार दिसते. मागील काही दिवसांपासून शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे Tata group market cap हे 365 बिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. आता याची तुलना आपल्या शेजारील राष्ट्राशी केली तर दिसेल की, त्यांचे मूल्य या ग्रुपपेक्षा कमी आहे.

Pakistan GDP Vs Tata Group वर माहिती

Pakistan GDP Vs Tata Group market cap

पाकिस्तानचा जीडीपी

त्यांच्या देशातील राजकीय अस्वस्थता, महागाई, दहशतवाद, मोठे कर्ज आणि सैन्याचा असलेला दबाव यामुळे दिवसेंदिवस त्यांचा आर्थिक विकास दर घटत चालला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एका अहवालानुसार, त्यांचा जीडीपी 341 अब्ज डॉलरवर आहे. त्यांची अर्थव्यवस्था भारतापेक्षा 11 पटीने छोटी आहे. त्यांच्याकडे सध्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व 8 अब्ज डॉलर इतकाच राहिलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्यावरील कर्ज हे 125 अब्ज डॉलर्सवर पोहोचलेले आहे.

टाटा ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ

त्यांच्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न्स दिलेले आहेत. याचे मुख्य कारण त्यांच्यावर लोकांचा वाढत असलेला विश्वास आहे. त्यांच्या टाटा मोटर्स, ट्रेंट आणि पावर यांनी सर्वात जास्त चांगली कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर टीसीएस, टीआरएफ, बनारस हॉटेल्स आणि ऑटोमोबाईल कार्पोरेशन ऑफ गोवा यांसारख्या कंपन्यांनी दुप्पट परतावा दिलेला आहे. 2023 या वर्षात दशकभरांनी आलेला IPO गुंतवणूकदारांना मालामाल करणारा ठरला होता.

मागील वर्षी त्यांच्या केमिकल कंपनीने सर्वात खराब कामगिरी केली होती. इन्वेस्टरला यात कुठलेही रिटर्न्स भेटले नाहीत, याउलट 5 टक्के नुकसान सहन करावे लागले होते. त्यांच्या जवळपास 25 कंपन्यांपैकी 24 ने उत्तम कामगिरी करून चांगला परतावा दिलेला आहे. Pakistan GDP Vs Tata Group Market cap अशी तुलना करायची झाल्यास टाटा समूहाने बाजी मारलेली आहे.

आयपीओंमुळे अजून वाढू शकते मार्केट कॅप

येणाऱ्या काळात त्यांच्या तीन कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. यात टाटा कॅपिटल, सन्स आणि प्ले यांचा समावेश आहे. यामधील एकाने सेबीकडे अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे, परंतु याविषयी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

Pakistan Gdp Vs Tata Group च्या तुलनेत भारत जिंकत आहे. भारत सध्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पाचव्या स्थानी आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, 2028 पर्यंत भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे आणि 2047 मध्ये एक नंबरवर पोहोचेल.

Scroll to Top