Nifty All-time High: निफ्टीने गाठला नवा उच्चांक

सोमवारीच 22,185 वर Nifty All-time High करून मागे फिरली होती. त्यानंतर त्यात थोडी घसरण पाहायला मिळाली. परंतु दुसऱ्या दिवशीच 22,215.60 या किमतीजवळ बंद झालेली आहे.

नवीन Nifty All-time High बद्दल माहिती

20 फेब्रुवारी 2024 रोजी निफ्टीने नवा उच्चांक गाठलेला आहे. येणाऱ्या काही दिवसात ही वाढ अशीच राहणार असल्याचे संकेत तज्ञांनी दिलेले आहेत. जुनी 22,185 ची किंमत तोडून आता 22,215.60 ही नवीन उच्चांकी किंमत गाठण्यात यश मिळवले आहे. सेन्सेक्स आणि बँक निफ्टी मध्ये सुद्धा उसळी पाहायला मिळालेली आहे, परंतु ते दोन्ही इंडेक्स त्यांच्या सर्वोच्च किमती पासून अजून दूर आहेत. गुंतवणूकदारांना यातून चांगला लाभ होताना दिसतो आहे.

Nifty All-time High

या शेअर्सची झाली मोठी मदत

बँकिंग क्षेत्रातील एचडीएफसी बँक 2.53%, ॲक्सिस बँक 2.27% आणि कोटक बँक 2.04% ने वरती होत्या. याव्यतिरिक्त पॉवरग्रिड, एनटीपीसी आणि बीपीसीएल या PSU stocks मध्ये सुद्धा तेजी पाहायला मिळाली. या सर्व शेअर्समधील तेजीमुळे Nifty All-time High पर्यंत पुन्हा पोहोचली आहे. एकदिवसीय (Daily) चार्टवर खूप स्ट्रॉंग कॅण्डल तयार झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अजून वाढ पाहायला मिळू शकते.

सर्वात जास्त प्रभाव असलेला रिलायन्स मात्र काहीशा दबावात दिसून येत आहे. सर्व शेअर्स पॉझिटिव्ह मध्ये असताना तो मात्र निगेटिव्ह होता. त्यामुळे निफ्टी 50 ला वरती जायचे असल्यास रिलायन्सची मदत लागणार आहे. तो सध्या 3000 या सायकॉलॉजिकल किमतीजवळ ट्रेड करत आहे. त्यामुळे त्यातील गुंतवणूकदारांची धाकधूक वाढलेली आहे.

आयटी क्षेत्रामधील इंडेक्समध्ये सुद्धा मागील दोन दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे. यात मुख्यतः TCS मध्ये घसरण होत आहे. निफ्टी 50 मधील तेजी अशीच राहावी असे वाटत असल्यास आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी आणि रिलायन्सने सपोर्ट केला पाहिजे.

तज्ञांचा इशारा

तज्ञांच्या मते, Nifty All-time High तोडत आहे, परंतु भारतात काही दिवसांमध्येच लोकसभेचे इलेक्शन लागणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी येथे सतर्क राहणे गरजेचे आहे. निवडणुकीतील निकालाचा शेअर बाजारावरती खूप मोठा परिणाम दिसून येतो. ही परिस्थिती ओळखून प्रत्येकाने सावधगिरीचे पाऊल उचलणे गरजेचे आहे. मागील इतिहासानुसार 2000 सालापासून दर आठ वर्षांनी मार्केट पडते. 2000, 2008, 2016 आणि आता 2024 हे 8 वे वर्ष आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी कुठलीही गुंतवणूक करणे धोक्याचे असेल.

Busy Bee Airways: स्पाइस जेटचे अजय सिंग आणि बीझी बी एअरवेजने गो फर्स्ट खरेदीसाठी दिली ऑफर

Scroll to Top