Mukka Proteins IPO Details: एका लॉटमध्ये मिळणार तब्बल 535 शेअर्स

Mukka Proteins IPO Details: 29 फेब्रुवारी रोजी सर्वांसाठी खुला झालेला मुक्का प्रोटीन आयपीओ एका लॉटमध्ये 535 शेअर्स देणार आहे. हा एसएमई प्रकारातील नसून मेनलाईन बोर्ड विभागाचा आहे. 8 कोटी शेअर्सच्या माध्यमातून 224 कोटी रुपये उभारण्याचे ध्येय कंपनीने ठेवलेले आहे. कमी किंमत असल्यामुळे पहिल्याच दिवशी ओव्हर सबस्क्राईब रेटिंग यांनी मिळवलेली आहे. रिटेल कोटा मधून याला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला आहे. अप्लाय करण्यापूर्वी Mukka Proteins IPO Details या लेखांमध्ये दिलेले आहेत, त्या तुम्ही जाणून घेतल्या पाहिजेत.

Mukka Proteins IPO Details

Mukka Proteins IPO Details

कंपनी विषयी माहिती

2003 मध्ये स्थापन झालेली मुक्का प्रोटीन्स लिमिटेड ही एक फिश प्रोटीन उत्पादने बनवणारी कंपनी आहे. मिडल इस्ट आणि साउथ ईस्ट एशियाच्या 11 देशांमध्ये ते त्यांचे प्रॉडक्ट एक्सपोर्ट करतात. यात बांगलादेश, इंडोनेशिया, फिलिपिन्स, चीन, सौदी अरेबिया, म्यानमार, ओमान, तैवान आणि साऊथ कोरिया यांसारख्या देशांचा समावेश आहे.

मुख्य तारखा

29 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान अर्ज करता येणार आहे. डिमॅट अकाउंट मध्ये 6 मार्च रोजी शेअर्स ट्रान्सफर केले जातील. त्यानंतर 7 मार्चला स्टॉक एक्सचेंजवर मुक्का प्रोटीन्स लिमिटेड ही कंपनी लिस्ट होईल.

प्राईस बँड

26 ते 28 रुपये प्रति शेअर असा प्राईस बँड ठेवण्यात आलेला आहे. याची फेस व्हॅल्यू 1 रुपया असेल, असे सांगण्यात आले आहे.

लॉट साईज आणि किंमत

एका लॉटमध्ये 535 शेअर्स असतील आणि त्यांची किंमत 14,980 रुपये असणार आहे. रिटेल कोटा मधून जास्तीत जास्त 13 लॉटला अप्लाय करता येणार आहे. सामान्य गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. कमी किंमत आणि जास्त शेअर्स असल्यामुळे पहिल्या काही तासांतच रिटेल कोटा पूर्ण सबस्क्राईब झालेला पाहायला मिळाला.

टोटल इशू साइज

8 कोटी स्टॉक्स गुंतवणूकदारांसाठी खुले केले जाणार आहेत. यातून त्यांनी 224 कोटी उभारण्याचे लक्ष ठेवले आहे.

प्रमोटर

कलानंद मोहम्मद हॅरिस यांच्याकडे इनिशियल पब्लिक ऑफरिंग अगोदर 100% मालकी होती. आतापर्यंत त्यांनी कुठलीही फंडिंग घेतली नव्हती.

जीएमपी

Mukka Proteins IPO gmp सध्या 25 रुपयांवर चालू आहे. हा प्रीमियम लिस्टिंगच्या दिवशी पर्यंत असाच राहिल्यास 89.29% परतावा भेटू शकतो.

तज्ञांचे मत

Mukka Proteins IPO Details वरून तज्ञांनी सांगितले की, कमी किमतीमुळे जास्त लोक आकर्षित होऊ शकतात. याचा फायदा कमी वेळेत मोठा परतावा घेणाऱ्या लोकांसाठी जास्त आहे. लॉंग टर्म गुंतवणूकदारांनी यापासून लांबच राहणे पसंत केले पाहिजे.

Rbi Fine On SBI: आरबीआयने एसबीआय सोबत इतर 2 बँकांना ठोठावला दंड

Scroll to Top