Paytm News
Paytm News: आरबीआयच्या आदेशानंतर पेटीएमच्या अडचणींमध्ये खूप वाढ झाली होती. आता या अडचणींमध्ये थोडासा दिलासा कंपनीला भेटताना दिसतो आहे. अमेरिकेच्या मॉर्गन स्टॅनली (Morgan Stanley) या कंपनीने पेटीएमची पॅरेंट कंपनी वन 97 कमुनिकेशन्सचे जवळपास 50 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. त्यांनी ओपन मार्केट मधून ही मोठी डील केल्याचे समजले आहे.
पेटीएम आणि मॉर्गन स्टॅनली डीलच्या डिटेल्स
सूत्रांच्या माहितीनुसार, मागील आठवड्यामध्ये शुक्रवारी मार्केट बंद होण्याच्या वेळी ओपन मार्केटमधून ही मोठी ऑर्डर एक्झिक्युट करण्यात आली होती. शेअर लोअर सर्किटवर असताना 487.2 रुपयांच्या किमतीवर खरेदी करण्यात आली आहे. 244 कोटी रुपयांची गुंतवणूक त्यांनी केल्याचे समोर आले आहे. त्यांनी बॉटम फिशिंग केली, असे तज्ञांनी म्हटले आहे.
Paytm news वर कंपनीकडूनमाहिती
विजय शेखर शर्मा संस्थापक असलेल्या पेटीएमकडून माहिती देण्यात आली की, 29 फेब्रुवारी नंतर सुद्धा आमचे कामकाज सुरळीतपणे चालणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी गोंधळून जाऊ नये. आरबीआयने Paytm payment bank वर निर्बंधने लावलेले आहेत, परंतु संपूर्ण कंपनीवर नाही. यामुळे वॉलेट्स, सेविंग अकाउंट, NCMC account आणि फास्टॅग यांच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. यूपीआय सगळ्यांना वापरता येणार आहे.
ब्रोकरेज कंपन्यांचे यावर मत
आरबीआयची सूचना आल्यापासून ब्रोकरेज कंपन्यांनी त्यांचे रेटिंग डाऊनग्रेड केलेले आहे. त्यांच्या नॉन कम्पलायन्स इशूमुळे त्यांच्यावरील निर्बंध अधिक जाचक केले जाणार आहेत. बाय टॅगवरून आता अंडरपरफॉर्म म्हणून जेफ्रिजने त्यांना डाऊनग्रेड केले आहे. त्यामुळे सर्वांनीच याबद्दल सावधगिरीचे पाऊल उचलल्याचे दिसत आहे.
आता अशी आहे स्थिती
एवढी मोठी डील झाल्यानंतर सुद्धा हा स्टॉक तिसऱ्या दिवशी लोअर सर्किटवर होता. आता यांची किंमत 438.50 रुपये झालेली आहे. त्यामुळे मोठ्या फर्मस् यांच्याबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेऊन आहेत.
वॉरन बफेट यांना तोटा
आयपीओ आल्यानंतर बर्कशायर हॅथवे यांनी जवळपास 600 कोटींपेक्षा जास्तच्या तोट्यावर या फिनटेक मधील सर्व हिस्सेदारी विकली होती. त्यावेळी याची किंमत 877 रुपये अशी होती. आयपीओ पासूनच गुंतवणूकदारांना यांनी धक्क्यावर धक्के दिलेले आहेत. कायमच मार्केटमध्ये यांच्या बद्दल न्यूज असतेच. आता मॉर्गन स्टॅनली यांना यामध्ये नफा होतो की तोटा हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे असेल.
(डिस्क्लेमर: आम्ही या ठिकाणी फक्त न्यूज देण्याचे काम करतो आणि कुठलाही शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत नाही.)
Flipkart Binny Bansal resigns: फ्लिपकार्ट मधील बंसल साम्राज्य संपुष्टात!
Pingback: RBI HDFC Bank News ने इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये खळबळ - Nationdaily.in
Pingback: RBI monetary policy: RBI कडून Repo Rate मध्ये कुठलाही बदल नाही - Nationdaily.in