Maharashtra budget 2024: महाराष्ट्र राज्याचा 2024 चा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यात त्यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी विविध घोषणा केल्या आहेत. त्यांनी शेतकरी, महिला, रेल्वे, ऐतिहासिक वारसा जतन आणि इतर राज्यांमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासंदर्भातील घोषणा अर्थसंकल्पात केल्या आहेत. राज्य येणाऱ्या काळात एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल, असे ध्येय त्यांनी समोर ठेवले आहे.
Maharashtra budget 2024 मध्ये अजित पवारांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा
राज्यातील इन्फ्रास्ट्रक्चरसाठीच्या घोषणा
- वांद्रे वर्सोवा सागरी सेतू पालघर पर्यंत करण्यात येणार आहे.
- मुंबई ते अहमदाबाद या नरेंद्र मोदींच्या महत्वकांशी प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण अंतिम टप्प्यात आले आहे.
- मिहान प्रकल्प नागपूर मध्ये होणार असून त्यासाठी 100 कोटी रुपयांची व्यवस्था केली जाणार आहे.
- आयोध्या आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्यात येणार आहे.
- मेक इन इंडिया अंतर्गत निर्यात वाढीसाठी 5 इंडस्ट्रियल पार्क तयार करण्यात येतील.
- सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
- चौथ्या जालना-यवतमाळ-पुणे-लोणावळा रेल्वे मार्गीके अंतर्गत येणाऱ्या खर्चासाठी 50 टक्के रक्कम राज्याकडून दिली जाणार आहे.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी तरतुदी
- मागेल त्याला सौर पंप दिले जाणार आहेत.
- शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे.
- 2,000 कोटी रुपयांची तरतूद विदर्भातील सिंचनासाठी येणाऱ्या काळात केली जाईल.
राज्यातील नागरिकांसाठी
- राज्य सरकार तर्फे 300 युनिट पर्यंत मोफत विज भेटणार आहे.
- 78,000 रुपयांपर्यंत रूफटॉप सोलर योजने अंतर्गत अनुदान मिळणार आहे.
- स्वातंत्र्य सैनिकांची पेन्शन डबल करण्यात आली आहे. 10,000 रुपयांची असणारी पेन्शन 20,000 रुपये करण्याला संमती देण्यात आली आहे.
ऐतिहासिक बाबींविषयी
- शिवजन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यात शिवसृष्टी आणि शिवकाळातलं गाव उभारल जाणार आहे.
- दहा किल्ल्यांना जागतिक स्तरावर ऐतिहासिक स्थळ म्हणून मान्यता भेटण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
- राज्यातील पर्यटन वाढवण्यासाठी अजिंठा, लोणार कळसूबाई आणि सागरी किल्ल्यांच्या जवळ अनेक सुविधा उभारल्या जातील.
Maharashtra budget 2024 मध्ये महिलांसाठी खास घोषणा
- महिला रिक्षा चालकांसाठी 5,000 पिंक रिक्षा देण्याची योजना राबविण्यात येणार आहे.
- 1 एप्रिल 2023 पासून सुरू असणारी लेक लाडकी स्कीम मुलींच्या सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे त्याच्या प्रसारासाठी अजून भर देण्यात येईल.
- 3,107 कोटी रुपयांची तरतूद महिला व बालकल्याण विकास विभागामार्फत करण्यात येणार आहे.
- 14 लाख रिक्त पदे अंगणवाडी सेविकांची भरण्यात येणार आहेत.
Maharashtra budget 2024 मध्ये या महत्त्वपूर्ण घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी केलेल्या आहेत.
Irctc Swiggy News: आता रेल्वेतही ऑर्डर करा स्विगीवरून फूड