Juniper Hotels IPO Review: आयपीओ द्वारे तब्बल 5 कोटी शेअर्स येणार बाजारात

Juniper Hotels IPO Review: जुनिपर हॉटेल्स लिमिटेड ही कंपनी 5 कोटी शेअर्स शेअर बाजारात आणणार आहे. याद्वारे 1,800 कोटी रुपये उभारले जाणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या 21 पासून ते 23 पर्यंत अर्ज करण्याची मुभा असणार आहे. 28 तारखेला स्टॉक मार्केटमध्ये ही कंपनी लिस्ट केली जाईल. अर्ज करण्याअगोदर Juniper Hotels IPO Review तुम्ही वाचण्याची गरज आहे.

जाणून घ्या Juniper Hotels IPO Review आणि इतर माहिती

टोटल इश्यू साइज

जुनिपर हॉटेल्स आयपीओच्या माध्यमातून 5 कोटी शेअर्स मार्केटमध्ये आणले जाणार आहेत. त्यांची किंमत 1,800 कोटींपर्यंत जाणार आहे.

महत्त्वाचे दिवस

21 फेब्रुवारीला चालू होऊन 23 तारखेला बंद होणार आहे. 26 ला अलॉटमेंट जाहीर होईल आणि दुसऱ्याच दिवशी डिमॅट मध्ये शेअर्स पाठवले जातील. स्टॉक एक्सचेंज वरती 28 फेब्रुवारी 2024 ला लिस्टिंग होणार आहे.

प्राईस बँड

342 ते 360 रुपये असा प्राईस बँड ठेवण्यात आलेला आहे आणि फेस व्हॅल्यू 10 रुपये प्रति शेअर आहे.

लॉट साइज

40 स्टॉक्स एका लॉटमध्ये दिले जाणार आहेत. त्यांची किंमत 14,400 ठेवण्यात आली आहे. हा मेन बोर्ड विभागातील असल्यामुळे लॉट साईज कमी आहे.

प्रमोटर्स

त्यांच्या प्रमोटर्समध्ये अरुण कुमार सराफ, जूनिपर इन्वेस्टमेंटस लिमिटेड, टू सीज होल्डिंग लिमिटेड आणि सराफ हॉटेल्स लिमिटेड यांचा समावेश आहे.

उद्दिष्ट

कर्जाचा परतावा करण्यासाठी आणि इतर कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी कॅपिटलचा वापर केला जाणार आहे.

Juniper hotels IPO GMP

मूळ किमती जवळच जीएमपी चालू आहे. 8 रुपयांच्या किमतीवर ग्रे मार्केटमध्ये हा स्टॉक सध्या ट्रेड करत आहे.

Rachna Ranade IPO review

YouTube सर्वात मोठ्या फायनान्स क्रिएटर रचना रानडे यांनी याबद्दल कुठलाही रिव्ह्यू अजून दिलेला नाही. त्यांनी याबद्दल अशी माहिती दिल्यास आम्ही नक्कीच येथे अपडेट करून तुम्हाला सांगू. याविषयीची पहिली अपडेट भेटण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा.

कंपनीची माहिती

1985 मध्ये स्थापन झालेली जुनिपर हॉटेल्स लिमिटेड ही एक लक्झरी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. दिल्ली मुंबई लखनऊ अहमदाबाद हम्पी आणि रायपूर मध्ये त्यांच्याकडे 7 हॉटेल्स आहेत.

Zenith Drug IPO Review आणि सर्व माहिती मराठीत

Scroll to Top