IIM Indore placements: आयआयएम इंदौरच्या एका विद्यार्थ्याला भेटलं 1 कोटींच पॅकेज

IIM Indore placements: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदौरने 100% प्लेसमेंट पूर्ण करून विक्रम केलेला आहे. महागाईमुळे अनेक नोकरीच्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक जण चांगले शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात आहे. या इन्स्टिट्यूटच्या एका विद्यार्थ्याने एक कोटींचे पॅकेज घेण्यात यश मिळवले आहे. आणि त्याचबरोबर इतरही विद्यार्थ्यांना चांगल्या जॉबच्या संधी भेटलेल्या आहेत.

या शिक्षण संस्थेच्या 27 वर्षांच्या इतिहासात असणारी सर्वात मोठी 594 विद्यार्थ्यांची बॅच विविध कंपन्यांमध्ये नोकरीस लागली आहे. 150 पेक्षा जास्त रिक्रुटर ने त्यांना ही संधी दिलेली आहे.

IIM Indore placements

IIM Indore placements

मुख्य कंपन्या

या मुख्य रिक्रुटर्स कंपन्यांमध्ये एअरटेल, ओला इलेक्ट्रिक, ॲक्सेंचर ऑपरेशनस, Navi, एअरटेल, एसबीआय सिक्युरिटीज, एचडीएफसी लाइफ, कॅम्स, माईंडस्प्रिंट, डेटालिंक, बजाज कंझ्यूमर केअर, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, एचडीएफसी लाइफ, अनअकॅडमी आणि हिरो फ्युचर एनर्जी यांचा समावेश होता.

ॲव्हरेज सीटीसी

चालू वर्षासाठी IIM Indore placements मध्ये 25.68 LPA एवढा ॲव्हरेज सीटीसी भेटलेला आहे. संस्थेचा आतापर्यंतचा ॲव्हरेज सीटीसी 24.50 LPA राहिलेला आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एकाला 1 कोटींचे पॅकेज भेटलेले आहे. हे एका ई-कॉमर्स कंपनीकडून देण्यात आले आहे.

प्रत्येक ब्रांचची प्लेसमेंट टक्केवारी

IIM Indore placements मध्ये 25% विद्यार्थ्यांनी कन्सल्टिंग क्षेत्रातील कंपन्यांमध्ये संधी मिळवलेली आहे. 19 टक्के हे सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रामध्ये गेलेले आहेत. फायनान्स मध्ये सुद्धा 19 टक्के सिलेक्शन झालेले आहे. आयटी क्षेत्रात 12 टक्के प्लेसमेंट झाल्या आहेत. ह्युमन रिसोर्स आणि ऑपरेशन मॅनेजमेंटच्या कंपन्यांनी 25% स्टुडंट्सला घेतलेले आहे.

आयआयएमचे डायरेक्टर हिमांशू राय यांची प्रतिक्रिया

हिमांशू राय यांनी सांगितले की, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील स्किल यांचा एकत्रित संगम घडवणे विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. इंडस्ट्री मधून येणारी मागणी आमचे विद्यार्थी पूर्ण करण्यात सक्षम आहेत. त्यांनी घेतलेली मेहनत आणि आम्ही केलेले प्रयत्न हे IIM Indore placements मध्ये दिसून आले आहे. त्याचबरोबर आम्ही नवीन 50 कंपन्यांबरोबर यावर्षी जोडले गेलो आहोत. त्यामुळे करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत.

चांगल्या इन्स्टिट्यूट मधून शिक्षण घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. इंडस्ट्रीला लागणारे स्किल सर्वच संस्थांमध्ये भेटत नाहीत. IIM सारख्या इन्स्टिट्यूटसमध्ये ऍडमिशन घेणे महत्त्वाचे असते, हे यावरून दिसून येते.

शार्क टँक इंडियाचे हे जजेस स्वतःच आहेत तोट्यात?

Scroll to Top