आता केंद्र सरकारकडून Bharat Rice मिळणार फक्त 29 रुपये किलोमध्ये

Bharat Rice

मोदी सरकारकडून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी स्वस्तात Bharat Rice लॉन्च करण्यात आला आहे. हा तांदूळ सगळ्यांना 29 रुपये किलो दराने विकला जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हे महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असल्याचे सांगितले जात आहे. किमतीमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या स्वस्तात मिळणाऱ्या तांदळावर अनुदान देण्यात येणार आहे. ग्राहकांना खरेदी करण्यासाठी पाच आणि दहा किलोच्या पॅकिंग मध्ये उपलब्ध असेल.

Bharat Rice अशाप्रकारे ग्राहकांच्या भेटीला येणार

bharat rice

पियुष गोयल करणार लॉन्च

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी स्वस्त भारत आटा आणि दाल नंतर आता भारत राईस लॉन्च करण्यात आलेला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दिल्लीच्या कर्तव्यपथावर केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री पियुष गोयल Bharat Rice ब्रँड लॉन्च करणार आहेत. 15 टक्क्यांनी तांदळाचा दर वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

अशी होणार विक्री

नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंजूमर फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि नॅशनल एग्रीकल्चर को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्यामार्फत हा तांदूळ विकला जाणार आहे. तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरसुद्धा याची विक्री केली जाईल.

कुठे मिळेल हा तांदूळ?

तीन केंद्रीय संस्थांच्या आउटलेट मध्ये आणि मोबाईल व्हॅन मध्ये उपलब्ध होणार आहे. लवकरच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म द्वारे उपलब्ध केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्र सरकारचा मुख्य उद्देश

सर्वसामान्यांना महागाईची झळ बसू नये, म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे. विरोधकांकडून असे सांगितले जात आहे की, सरकार लोकसभा निवडणुकीमुळे हा निर्णय घेत आहे. सर्वसामान्य मतदारांचा विश्वास संपादित करण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. हा निर्णय घेऊन सरकार हे दाखवण्याचा प्रयत्न करते आहे की, आमचे काम जनसामान्यांसाठी आहे. याबद्दलची घोषणा करताना नरेंद्र मोदींनी सांगितले की, माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये मी खूप महत्त्वाचे निर्णय घेणार आहे. त्यानंतर त्यांनी आताच्या वेळेस 400 पेक्षा जास्त सीट्स निवडून आणू, असा दावा केला आहे. गरिबांसाठी या योजनेचा नक्कीच फायदा होणार आहे.

FAQ

  1. इंडिया मध्ये सर्वात चांगला तांदूळ कोणता आहे?

    बासमती हा सर्वात चांगला तांदूळ आहे.

  2. कोणत्या राज्याचा तांदूळ सर्वात चांगला आहे?

    पश्चिम बंगालचा सर्वात चांगला आहे.

  3. कोणता तांदूळ सगळ्यात महाग आहे?

    जपानचा किनमेमाई प्रीमियम राइस सगळ्यात महाग आहे.

Flixbus India launched आता एसटी होणार बंद?

2 thoughts on “आता केंद्र सरकारकडून Bharat Rice मिळणार फक्त 29 रुपये किलोमध्ये”

  1. Pingback: KFC in Ayodhya होणार पण या आहेत अटी - Nationdaily.in

  2. Pingback: काय आहे लखपती दीदी योजना? Lakhpati Didi Yojana In Marathi - Nationdaily.in

Comments are closed.

Scroll to Top