Gautam Adani net worth पोहोचली $100 बिलियन

काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं की, गौतम अदानी यांनी रिलायन्स ग्रुपच्या मुकेश अंबानींना श्रीमंताच्या यादीत मागे टाकले होते. Hindenburg रिपोर्ट येण्यापूर्वी Gautam Adani net worth ही $100 बिलियनच्या पुढे होती. त्यानंतर मात्र Adani group शेअर्स प्रचंड कोसळले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा त्यांचे काम सुरळीत चालू झाले.

Gautam Adani net worth पुन्हा $100 बिलियनवर

हिंडेनबर्ग ने मॅन्युपूलेशन आणि फ्रॉड केल्याची बातमी समोर आणल्यानंतर अदानी ग्रुपचे स्टॉक कोसळले होते. आता एका वर्षानंतर पुन्हा एकदा Gautam Adani net worth ने 100 बिलियन डॉलरचा मार्क पार केला आहे. असे असले तरीही ते अजून त्यांच्या सर्वोच्च नेटवर्थ पासून $50 बिलियनने मागे आहेत. त्यांनी त्यांच्यावरील कर्ज परत केले आणि रेगुलॅरिटीजला ट्रस्ट दाखवून दिला, त्यामुळे त्यांची ही वाढ झालेली दिसते. ते आता जगातील 12 व्या क्रमांकावरील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार, आता ते मुकेश अंबानींपेक्षा एका क्रमांकाने अधिक स्थानावर आहेत.

Gautam Adani net worth crossed $100 billion

मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक

कतार इन्व्हेस्टमेंट अथोरिटी ने $500 मिलियन आणि टोटल एनर्जीज SE ने $300 मिलियनची गुंतवणूक जॉईंट वेंचर असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये केली आहे. हिंडेनबर्गच्या आरोपानंतर ते पहिल्यांदा परदेशामध्ये डॉलर बॉण्ड द्वारे $500 मिलियन उभे करणार असल्याची चर्चा आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर झाला बदल

भारतीय सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर चौकशी थांबवण्याचे आदेश दिले आणि या ग्रुपच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. विशेष करून Adani enterprises shares मध्ये खूप वाढ झाली. सलग आठ दिवसांमध्ये यात उसळी दिसली आणि त्यांच्या रिझल्ट मध्ये 130% प्रॉफिट वाढलेला दिसला.

अशी झाली गौतम अदानींची सुरुवात

कॉलेज सोडल्यानंतर 1980 मध्ये त्यांनी मुंबईच्या डायमंड मार्केटमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना खूप मदत झाली. भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी भारताला आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी उद्योजकांना आवाहन केले. त्यात गौतम अदानींनी कोळसा, विमानतळ, मीडिया, डेटा सेंटर, ग्रीन एनर्जी आणि कन्स्ट्रक्शन विभागांमध्ये दैदिप्यमान कामगिरी केली. यामुळे Gautam Adani net worth $150 बिलियनच्या घरात पोहोचली. ते त्यांच्या घरातील फर्स्ट जनरेशन बिझनेसमन आहेत. जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत त्यांनी तिसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतली होती.

RBI monetary policy: RBI कडून Repo Rate मध्ये कुठलाही बदल नाही

Scroll to Top