Flixbus India Launch झाली
जगामध्ये सगळ्यात मोठी इंटरसिटी बस कंपनी म्हणून फ्लिक्सबसला ओळखले जाते. लवकरच ही कंपनी भारतामध्ये सुद्धा त्यांची सेवा सुरू करणार आहे. Flixbus India Launch करताना त्यांच्या सीईओंनी म्हटले की, भारत हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मार्केट आहे. या देशात आम्हाला खूप मोठी संधी आहे. त्यामुळे आम्ही याचा उपयोग नक्कीच करून घेऊ.
जगामध्ये जवळपास 42 देशांमध्ये या कंपनीच्या सेवा सुरू आहेत. आता जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या बस मार्केट असलेल्या देशाची त्यांनी 43 व्या स्थानी निवड केलेली आहे. 6 फेब्रुवारीला त्यांची पहिली गाडी महामार्गावर धावेल. पहिल्या बुकिंगसाठी (Flixbus India booking) त्यांनी 99 रुपयांची स्पेशल ऑफर ठेवलेली आहे. त्यांच्याकडून असेही सांगण्यात आले आहे की, भारतीयांना कमीतकमी दरात योग्य सुविधा देण्याचे आम्ही काम करू. त्यांनी काही लोकल कंपन्यांसोबत पार्टनरशिप केली आहे. काही रूट्सवरती त्यांच्या स्वतःच्या प्रीमियम गाड्या BS6 इंजिन सोबत धावतील.
Flixbus India Launch नंतर अशी करणार मार्केटमध्ये एंट्री
असे असतील Flixbus India Routes
उत्तर भारतामध्ये त्यांची सेवा पहिल्यांदा सुरू करण्यात येणार आहे. Flixbus India Launch झाल्यानंतर देशातील हिमाचल, पंजाब, जम्मू कश्मीर, नवी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये चालू होणार आहे. दिल्लीला ते त्यांच्या रूटने चंदीगढ, मनाली, जयपुर, अयोध्या, रिषिकेश, हरिद्वार, देहराडून, अजमेर, वाराणसी, गोरखपुर, धर्मशाला, जोधपुर, अमृतसर आणि लखनऊ या शहरांशी जोडतील.
सेफ्टीच्या बाबतीत एक नंबर
प्रवाशांसाठी 24×7 हेल्पलाइन सुविधा आहे. एखाद्या महिलेने सीट आरक्षित केल्यानंतर तिच्या शेजारील सीट आपोआप फक्त इतर महिलेसाठी उपलब्ध राहील. त्यांनी ट्रॅफिक कंट्रोल वार्ड सुद्धा तयार केलेला आहे. आतमध्ये असलेल्यांसाठी टू पॉईंट सीट बेल्ट देण्यात आलेले आहे. प्रवाशांची सेफ्टी हा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, असे त्यांनी सांगितले. परदेशांमधील सर्व देशांमध्ये यांच्या सेफ्टी बद्दल खूप चांगले ऐकायला भेटते. त्यामुळे सुखरूप प्रवास होण्यासाठी ग्राहक नक्कीच त्यांना पसंती देतील.
महाराष्ट्रातल्या एसटीला असेल का धोका
देशाच्या उत्तर भागामध्ये त्यांनी पहिल्यांदा सेवा सुरू करण्याचे ठरवले आहे, त्यामुळे सध्यातरी आपल्या लाडक्या लाल परीला यातून मार्केटमध्ये कुठलीही स्पर्धा मिळणार नाही. ही कंपनी उत्तरेकडील राज्यांमध्ये स्थिरस्थावर होईपर्यंत एसटीने त्यांच्या सुविधा चांगल्या केल्या पाहिजेत.
जाणून घ्या BLS E Services IPO Details मग म्हणू नका सांगितलं नाही
Pingback: आता केंद्र सरकारकडून Bharat Rice मिळणार फक्त 29 रुपये किलोमध्ये - Nationdaily.in