फ्लिपकार्ट यूपीआय पेमेंटसाठी सज्ज, अशी आहे प्रक्रिया

फ्लिपकार्ट आता डिजिटल पेमेंट क्षेत्रात पदार्पण करत आहे. ॲक्सिस बँकेसोबत भागीदारी करून फ्लिपकार्ट यूपीआय पेमेंट ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

या नवीन सुविधेमुळे, थेट कंपनीच्या ॲपवरून ऑनलाइन पेमेंट्स करणे शक्य होणार आहे. तसेच, तुम्ही स्थानिक विक्रेत्यांना, मित्रांना आणि कुटुंबियांना यूपीआय आयडी, फोन नंबर किंवा क्यूआर कोड वापरून पैसे पाठवू शकता. याशिवाय, तुम्ही बिल सुद्धा देऊ शकता.

फ्लिपकार्ट यूपीआय पेमेंटसाठी कसे वापरावे?

Flipkart upi payments फ्लिपकार्ट यूपीआय पेमेंट

या स्टेप्स फॉलो करा

  • तुमच्या स्मार्टफोनवर प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून ॲप डाउनलोड करा आणि ते इनस्टॉल करा.
  • ॲपमध्ये ‘यूपीआय’ पर्याय शोधा आणि त्यावर टॅप करा.
  • ‘बँक खाते जोडा’ (Add bank account) पर्याय निवडा.
  • तुम्ही ज्या बँकेला यूपीआयशी लिंक करू इच्छिता ती बँक निवडा.
  • व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा.
  • व्हेरिफिकेशन झाल्यानंतर, तुम्ही पैसे पाठवण्यासाठी वापरण्यास सुरुवात करू शकता.

मात्र लक्षात ठेवा आता सध्या ही यूपीआय सेवा केवळ Android वापरणारे वापरकर्ते वापरू शकतात.

फ्लिपकार्ट यूपीआय पेमेंट्सचे फायदे

  • सोयीस्कर: ॲपमधून थेट पैसे पाठवण्यास खूप उपयुक्त आहे.
  • सुरक्षित: यूपीआय ही एक राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आणि सुरक्षित पेमेंट सिस्टीम आहे.
  • वेगवान: पैसे जलद आणि सोप्या पद्धतीने पाठवता येतात.

ऑनलाइन पैसे पाठवण्याच्या मार्केटमध्ये त्यांची सुरुवात ही भारतातील वाढत्या डिजिटल स्वीकृतीचा एक भाग आहे. आता तुम्ही तुमच्या सोयीस्करतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तुमचे ऑनलाइन व्यवहार अगदी सहजरित्या करू शकता!

SBI Wecare Deposit Scheme: ५ वर्षात पैसे दुप्पट करण्याची संधी!

Scroll to Top