Flipkart Binny Bansal resigns: फ्लिपकार्ट मधील बंसल साम्राज्य संपुष्टात!

Flipkart Binny Bansal resigns: सचिन बंसल नंतर आता बिन्नी बंसल यांनीही फ्लिपकार्टचा राजीनामा दिलेला आहे. आता ही कंपनी पूर्णपणे वॉलमार्टच्या हातात गेलेली आहे. 2007 मध्ये स्थापन केलेल्या या कंपनीच्या दोन्ही फाउंडरने आता राजीनामा दिलेला आहे.

2007 या वर्षी आयआयटीमध्ये असताना सचिन यांच्या डोक्यात एक कल्पना आली आणि त्यांनी बिन्नी या त्यांच्या मित्राबरोबर फ्लिपकार्टची स्थापना केली. 2018 मध्ये वॉलमार्टने 16 बिलियन डॉलरमध्ये हिस्सेदारी विकत घेतली होती. सचिन यांनी 1 बिलियन डॉलरमध्ये त्यांचा असणारा स्टेक विकल्यानंतर बिन्नी यांनी सुद्धा सीईओ पदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी कंपनीच्या बोर्डाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे.

Flipkart Binny Bansal resigns केल्यानंतरच्या गोष्टी

राजीनामा देण्याची कारणे

त्यांनी हा निर्णय त्यांची कंपनीतील सर्व हिस्सेदारी विकल्यानंतर घेतलेला आहे. आता ई-कॉमर्स इंडस्ट्रीमध्ये किंग असलेल्या कंपनीतून बंसल युगाचा अंत झाल्याचे स्पष्ट दिसते आहे. या निर्णयाचे मुख्य कारण सांगितले जात आहे की, ते पुन्हा एकदा एक नवी ई-कॉमर्स कंपनी सुरू करणार आहेत. ते आता OppDoor या कंपनीवर लक्ष केंद्रित करणार आहेत. ते या ब्रँडला खूप मोठा करण्याचे ध्येय पुढे ठेवून काम करणार आहेत. जागतिक पातळीवर याची ओळख निर्माण करणार आहेत. त्यांनी ईकॉमर्समध्येच पुढे जाण्याचे ठरवले आहे, परंतु सचिन यांनी Navi या ब्रँडच्या नावाने फिनटेक कंपनी चालू केलेली आहे.

Flipkart Binny Bansal resigns

राजीनामा दिल्यानंतर फ्लिपकार्टला दिल्या शुभेच्छा

Flipkart Binny Bansal resigns केल्यानंतर त्यांनी सांगितले की, आम्ही चालू केलेली ही कंपनी उत्तम काम करत आहे. चांगल्या लोकांच्या हातात असल्यामुळे मला आता चिंता नाही.

त्यामुळेच मी हा निर्णय घेतलेला आहे. या ई-कॉमर्स कंपनीचे भविष्य एकदम उज्वल आणि विकासाने भरपूर राहणार आहे. मी सोडल्यानंतर सुद्धा माझा या कंपनीला पूर्ण पाठिंबा असेल.

मी त्यांच्या या उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी ही कामना करतो.

कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शुभेच्छा

एवढी वर्ष सोबत काम केल्यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या संस्थापकांमध्ये चांगले संबंध निर्माण झाले आहेत. कंपनीचे सीईओ कृष्णमूर्ती यांच्याकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. वॉलमार्ट कडूनही Flipkart Binny Bansal resigns केल्यानंतर प्रगती करण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत, असे काही मीडिया रिपोर्ट करून कळले आहे.

LIC stake in HDFC Bank: आरबीआयच्या आदेशाने एलआयसी खरेदी करणार एचडीएफसी बँकेची 9.99% हिस्सेदारी

Scroll to Top