Fastag KYC update online आणि ऑफलाईन करण्याची प्रक्रिया

फास्टॅगबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. या सूचनेमध्ये त्यांनी 29 तारखेपर्यंत केवायसी अपडेट करण्यासाठी सांगितले आहे. त्यानंतर मात्र पुढील सूचना येईपर्यंत हा बदल केला नसल्यास वापरता येणार नाही. FASTag KYC update online आणि ऑफलाईन करण्याची सर्व प्रक्रिया अगदी घरी बसल्या करता येऊ शकते. यासाठी तुम्ही हा दिलेला लेख पूर्ण वाचून निर्णय घ्यावा.

फास्टॅग म्हणजे काय?

फास्टॅग म्हणजे इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनची सिस्टीम आहे, जी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी वापरते. वाहनावर लावलेला कोड स्कॅन झाल्यानंतर पैसे बँक खात्यावरून किंवा कार्ड वरून कापले जातात. ही सर्व प्रक्रिया नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून संचलित केली जाते.

Fastag KYC update online and offline process

Fastag KYC update online आणि ऑफलाईन

आवश्यक असणारी कागदपत्रे

  • लायसन्स
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • व्हेईकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (R.C.)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • पत्त्याचा पुरावा
  • मतदान कार्ड आणि पासपोर्ट असल्यास जवळ ठेवा.

Fastag KYC update online करण्यासाठी स्टेप्स

  • तुमचे लिंक असलेल्या बँकेच्या वेबसाईटवर जा.
  • लॉग इन करण्यासाठी अधिकृत मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओटीपी भेटेल. तो ओटीपी टाकून लॉग इन करा.
  • माय प्रोफाइल वर जा आणि तेथून केवायसी पर्यायावर क्लिक करा.
  • तिथे तुम्हाला सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे सबमिट करावी लागतील.
  • अशाप्रकारे तुमचा Fastag KYC update online होईल.

ऑफलाइन प्रक्रिया

काही कारणास्तव ऑनलाइन प्रक्रियेत अडचण आल्यास offline सुद्धा करता येते. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जावे लागेल. त्यानंतर त्यांनी दिलेला फॉर्म भरून आवश्यक असणारी कागदपत्रे त्यास जोडून द्या. सर्व माहिती तपासल्यानंतर तुमचे अपडेट केले जाईल.

ऑनलाइन केवायसी अपडेट स्टेटस तपासण्यासाठी स्टेप्स

  • fastag.ihmcl.com या सरकारी वेबसाईटवर जा.
  • त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओटीपी येईल, तो सबमिट करून लॉग इन करा.
  • माय प्रोफाईलवर गेल्यानंतर केवायसी स्टेटस पर्याय निवडा.
  • यात तुम्हाला अपडेट आहे किंवा नाही याबद्दल स्टेटस दिसेल.

ऑनलाइन आणि ऑफलाईन अपडेट करण्याच्या प्रक्रियेबद्दल तुम्हाला सर्व माहिती आता भेटली असेल. अशीच चांगली माहिती मिळण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही सुविधा सुरू राहण्यासाठी 29 फेब्रुवारीच्या अगोदर सर्व प्रोसेस करणे गरजेचे आहे, असे न केल्यास ही सेवा वापरता येणार नाही.

Rbi Fine On SBI: आरबीआयने एसबीआय सोबत इतर 2 बँकांना ठोठावला दंड

Scroll to Top