KFC in Ayodhya होणार पण या आहेत अटी

KFC in Ayodhya

अमेरिकेची फास्ट फूड चैन KFC अयोध्यामध्ये लवकरच त्यांचे आउटलेट ओपन करणार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. राम मंदिराचे उद्घाटन झाल्यापासून अयोध्या एक पर्यटन स्थळ बनले आहे. त्या ठिकाणी विविध कंपन्यांनी आणि हॉटेल्सने जागा घेण्यास सुरुवात केली आहे. Kentucky Fried Chicken असे पूर्ण नाव असलेली ही फास्ट फूड चैन त्यांच्या प्रसिद्ध चिकनसाठी ओळखली जाते.

KFC in Ayodhya साठी या अटींचा मार्ग

या धार्मिक शहराच्या बाहेर त्यांचे एक मोठे आऊटलेट आहे. मुख्य शहरामध्ये मांसाहारी दुकानांना पूर्णतः बंदी आहे. असे असले तरीही सरकारने त्यांना त्यांचे हॉटेल उघडण्यासाठी परवानगी देण्याचे कबूल केले आहे.

kfc in ayodhya

या असतील अटी

त्यांना त्यांचे आउटलेट KFC in Ayodhya मध्ये ओपन करायचे असल्यास खाण्याच्या मेनूमध्ये बदल केला जाणे आवश्यक आहे. यामध्ये पूर्णतः शाकाहारी खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले जावेत, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. सरकारी अधिकारी विशाल सिंग यांनी मनीकंट्रोलला सांगितले की, त्यांना फक्त शाकाहारी पदार्थच लोकांना खाऊ घालावे लागतील. भारतातील सर्वच मोठ्या रेस्टॉरंट्सना आम्ही आमंत्रित करत आहोत. त्या सर्वांना फक्त एकच अट आहे की, त्यांनी पंच कोशीच्या आत मध्ये मांसाहारी अन्नपदार्थ विकु नये.

बिझनेस वाढवण्याची मोठी संधी

KFC in Ayodhya झाले तर याचा खूप मोठा फायदा कंपनीला होणार आहे. इतर फास्ट फूडच्या कंपन्या त्यांचे स्टोअर ओपन करण्यासाठी उत्सुक आहेत. याचे मुख्य कारण भारत आणि जगातून असंख्य पर्यटक दरवर्षी या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही मोठी संधी आहे.

राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यापासूनच अवध कुमार वर्मा यांनी पिझ्झा हटचे स्टोअर ओपन केले होते. परंतु ते जवळपास 8 किलोमीटर लांब होते. आता व्हेज मेनू करून राम पथावर उघडण्यासाठी ते उत्सुक आहेत. येथे बिझनेस मध्ये खूप वाढ होत आहे. डॉमिनोजचे पिझ्झा आउटलेट दिनेश यादव यांनी उघडल्यानंतर त्यांना आता खूप फायदा होताना दिसत आहे.

यापूर्वीही अहमदाबादमध्ये मेनूत केले आहेत बदल

सबवे, डॉमिनोज आणि पिझ्झा हट यांनी अहमदाबादमध्ये रेस्टॉरंट उघडल्यानंतर ते पूर्णतः व्हेज केले होते. त्याचबरोबर जैन कम्युनिटीसाठी वेगळा मेनू सुद्धा तयार केला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सबवेने पंजाबमधील एका प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा अशीच सुविधा देऊ केली आहे.

आता केंद्र सरकारकडून Bharat Rice मिळणार फक्त 29 रुपये किलोमध्ये

1 thought on “KFC in Ayodhya होणार पण या आहेत अटी”

  1. Pingback: Zydus Lifesciences Buyback होणार 600 कोटी रुपयांचे - Nationdaily.in

Comments are closed.

Scroll to Top