Irctc Swiggy News: आता रेल्वेतही ऑर्डर करा स्विगीवरून फूड

Irctc Swiggy News: इंडियन रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनने ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी बरोबर अन्न पुरवण्यासाठी करार केलेला आहे. यामध्ये कोणताही प्रवासी आयआरसीटीसीच्या ई-केटरिंग पोर्टलवरून ऑनलाइन ऑर्डर देऊ . सुरुवातीला ही सेवा फक्त चार रेल्वे स्टेशनवर देण्यात येईल आणि त्यानंतर इतर स्टेशनवर चालू करण्यात शकतातयेईल.

Irctc Swiggy News बद्दल सर्व माहिती

Irctc Swiggy News

या चार मुख्य स्थानकांवर होणार सुरू

ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीची पॅरेंट कंपनी बंडल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड बरोबर हा करार करण्यात आलेला आहे. या करारानुसार प्रवाशांनी आधी दिलेल्या ऑर्डरवर त्यांना अन्न दिले जाणार आहे. प्रथम एक पायलट प्रोजेक्ट म्हणून चार रेल्वे स्थानकांवर ही सुविधा देण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक राज्यातील मुख्य स्टेशनवर ही सुविधा मिळेल. विजयवाडा, बेंगलोर, विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या 4 स्थानकांवर ही सुविधा देण्याचे काम सुरू होणार आहे. रेल्वेचा प्रवास विमानाइतकाच सुखकर व्हावा, यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत. प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा देण्याचा कंपनीचा मुख्य उद्देश आहे.

स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीवरून Irctc Swiggy News बाहेर आली. यामुळे ग्राहक खूप खुश झाले आहेत.

रेल्वेमध्ये स्विगी वरून ऑर्डर करण्याची प्रोसेस

  • पहिल्यांदा आयआरसीटीसीच्या ई-केटरिंग पोर्टलवर जा.
  • तेथे ऑर्डर घेण्याच्या स्टेशनचे नाव आणि पीएनआर टाकून सबमिट करा.
  • त्यानंतर स्विगी ऑर्डरसाठी सिलेक्ट करा आणि तुम्हाला पाहिजे असलेले पदार्थ निवडा.
  • तुम्हाला पाहिजे असलेल्या मुख्य स्टेशनवर तुमचा आवडता पदार्थ खाण्यासाठी भेटून जाईल.
  • ही सर्व प्रक्रिया स्टेशन येण्यापूर्वी करणे गरजेचे आहे.

शेअर मध्ये मोठा बदल

Irctc Swiggy News बाहेर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयआरसीटीसीचा शेअर तीन टक्क्यांनी वर होता. 936 रुपयांच्या किमतीवर मागील दिवशी बंद झाल्यानंतर गॅप अप ओपन होऊन त्यात तेजी कायम राहिली. दिवस अखेर 964.85 रुपयांच्या किमतीवर बंद झाला. गुंतवणूकदारांना मागील सहा महिन्यांच्या कालावधीत 40% परतावा या कंपनीने दिलेला आहे. त्यामुळे त्यांचा या कंपनीवर खूप विश्वास आहे. तज्ञांच्या मते, डेली चार्टवर मोमेंटम खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याचबरोबर व्हॉल्युम सुद्धा तगडा आहे. ब्रेकआउट लेव्हलला असल्यामुळे त्यावर लक्ष ठेवून गुंतवणूक करणे महत्त्वाचे असेल.

ITC Prataap Snacks News: आयटीसीचा शेअर असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Scroll to Top