ITC Prataap Snacks News: आयटीसीचा शेअर असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

ITC Prataap Snacks News: भारतातली सर्वात मोठी दुसरी FMCG कंपनी आयटीसी ही विविध प्रकारची उत्पादने निर्माण करते. इकॉनोमिक टाइम्सच्या माहितीनुसार, प्रताप स्नॅक्स लिमिटेड या कंपनीत 47% हिस्सेदारी खरेदी करणार आहे. त्यामुळे शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. याबद्दलची सर्व बातमी नेशनडेलीवर प्रसिद्ध झालेल्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

ITC Prataap Snacks News बद्दल सर्व माहिती

ITC Prataap Snacks News

प्रताप स्नॅक्स यांचे बाजारामध्ये ‘यल्लो डायमंड चिप्स’ खूप प्रसिद्ध आहेत. या ब्रँड मुळेच त्यांना ओळखले जाते. त्याचबरोबर त्यांच्याकडे असणाऱ्या अवध ब्रँडच्या नावाखाली नमकीन पदार्थ विकले जातात. आयटीसीला नवीन मार्केटमध्ये एन्ट्री करण्यासाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे. ITC Prataap Snacks मध्ये 47% स्टेकची मालक होणार आहे. यातून त्यांच्याकडे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार सोपवले जातील, असे सांगण्यात आले आहे.

डिसेंबर महिन्यामध्येच प्रताप स्नॅक्सच्या प्रमोटर्समध्ये याबद्दल चर्चा सुरू होती. सर्वात आधी हल्दीराम आणि बिकाजी फूड्स बरोबर झालेल्या चर्चेत त्यांच्याकडून व्हॅल्युएशन कमी लावण्यात आले होते. त्यामुळे त्या दोन्ही डील नाकारण्यात आल्या होत्या.

या कारणामुळे ITC Prataap Snacks मध्ये करत आहे गुंतवणूक

भविष्यातील संधी ओळखून त्यांनी ‘आयटीसी नेक्स्ट स्ट्रॅटेजी’ म्हणून प्रोग्राम लॉंच केलेला आहे. यात भविष्यातील बिझनेससाठी उपयोगी ठरणाऱ्या प्रॉडक्टचे विश्लेषण केले जाते. ही कंपनी खरेदी केल्यानंतर त्यांना या सेगमेंटमध्ये अजून जास्त काम करता येईल.

शेअर्समध्ये तुफान बदल

बातमी बाहेर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा स्टॉक 6 टक्क्यांनी गॅप अप उघडला. त्यानंतर दहा टक्क्यांपर्यंत तेजी झाली होती, असे असूनही स्टॉक त्यानंतर कोसळला. 1,336.40 वरून दिवसाच्या शेवटी 1,217 रुपयांच्या किमतीवर बंद झाला. एका दिवसातील एवढी उलाढाल पाहून तज्ञांनी गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा दिलेला आहे.

एका वर्षात गुंतवणूकदारांना 55% आणि 6 महिन्यात 38 टक्के परतावा दिलेला आहे. डिसेंबर 2023 च्या तीमाहित त्यांच्या नेट सेल्समध्ये 8.08% वाढ झालेली आहे आणि 408.31 कोटी रुपयांचा सेल्स झालेला आहे. त्याचबरोबर 10.79 कोटी रुपयांचा त्यांना नेट प्रॉफिट झालेला आहे. एवढे चांगले निकाल असून सुद्धा मागील काही दिवसांपासून त्यांचे शेअर्स कोसळत आहेत. गुंतवणूकदारांना आशा आहे की, या बातमीनंतर त्यांना येणाऱ्या काळात चांगले परिणाम पाहायला मिळतील.

एफडी करण्याचा विचार करताय? या 7 Small finance Bank FD rates देत आहेत 8 टक्के पेक्षा जास्त

Scroll to Top