Blinkit Outage: डिलिव्हरी ॲप ब्लिंकइट पडले बंद युजर्सला झाला मनस्ताप

Blinkit Outage: 13 फेब्रुवारी रोजी ब्लिंकइट हे 10 मिनिट डिलिव्हरी ॲप बंद पडले होते. त्यामुळे बऱ्याच युजर्सला हे ॲप उघडता येत नव्हते. कंपनीकडूनही यावर कुठलाच प्रतिसाद देण्यात आला नव्हता. बंद पडल्यानंतर ट्रबलशूटिंगसाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला काही स्टेप्स सुद्धा सांगणार आहोत.

Blinkit Outage बद्दल माहिती

Blinkit Outage

ब्लिंकइट 10 मिनिटांत ग्रोसरी डिलिव्हरी ॲप आहे. ग्राहकाला अगदी घरबसल्या सर्व वस्तू आणून देण्याचे काम ते करतात. परंतु 13 तारखेला या कंपनीचे ॲप अचानक बंद पडले आणि त्यांच्या युजर्सला खूप ताण सहन करावा लागला. संपूर्ण भारतामध्ये अशीच स्थिती पाहायला मिळाली. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि बेंगलोर अशा भारताच्या मोठ्या शहरांमध्ये Blinkit Outage मोठ्या प्रमाणावर दिसून आले.

अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर ॲपवर “समथिंग हॅज गॉन रॉंग” असा मेसेज दिसू लागला होता. काही ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या सुद्धा दिसत नव्हत्या. त्यामुळे कुठलीच ऑर्डर कॅन्सल करता येत नव्हती आणि पेमेंट मध्ये सुद्धा खूप अडचणी येत होत्या.

काही युजर्सनी तर ॲप चालत नाही, म्हणून डेस्कटॉप आणि लॅपटॉप वर वेगवेगळ्या ब्राउझर मधून वेबसाईट ओपन करण्याचा प्रयत्न केला. त्यातही त्यांना यश आले नाही. त्यावर त्यांना एरर कोड 502 असे दिसत होते.

या मनस्तापाविषयी सोशल मीडियावर लाट उसळली. प्रत्येक जण त्यांचे अनुभव सांगू लागला होता. त्यांना पडलेल्या प्रश्नाची उत्तरे मिळवण्यासाठी प्रत्येक जण धडपडत होता. परंतु यावर कुठलीही प्रतिक्रिया त्यांना मिळाली नाही.

Blinkit ॲप बंद पडल्यानंतर या पद्धतीने करू शकता चालू

  • वेबसाईट चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी isitdownrightnow.com वर त्यांचा URL टाकून चेक करा.
  • तुमचे इंटरनेट कनेक्शन चेक करा.
  • एकदा पेज रिफ्रेश करून पहा.
  • स्मार्टफोन स्विच ऑफ करून पुन्हा चालू करा.
  • एकदा ब्राउझर हिस्टरी आणि कॅचे डाटा डिलीट करून टाका.
  • क्रोम सोडून दुसऱ्या ब्राउझरमध्ये उघडा.
  • वेबसाईटला इनकॉग्नेटो मोड मध्ये उघडून बघा.

Blinkit Outage नंतर हे सर्व करून जरी तुमचा प्रॉब्लेम सुटला झाला नसेल, तर दोन ते तीन तासानंतर ही प्रक्रिया पुन्हा करून बघा. त्यांच्या ॲपचा युजर एक्सपिरीयन्स खूप चांगला असल्यामुळे त्यांना खूप ग्राहक मिळाले आहेत. घरबसल्या किराणा भेटत असल्यामुळे घरच्या महिलांना बाहेर जावे लागत नाही. आता त्यांची सर्व सेवा व्यवस्थित चालू झालेली आहे. पुन्हा जर असा प्रकार काही घडला तर आमच्या या ट्रबलशूटिंग स्टेप तुम्ही फॉलो करू शकता.

KFC in Ayodhya होणार पण या आहेत अटी

Scroll to Top