Apeejay Surrendra Park Hotels IPO ला गुंतवणूकदारांकडून मिळतोय चांगला प्रतिसाद

Apeejay Surrendra Park Hotels IPO

Apeejay Surrendra Park Hotels IPO अर्ज करण्यासाठी शेअर बाजारात उपलब्ध झालेला आहे. पहिल्या दिवशी रिटेल गुंतवणूकदारांनी पाच पेक्षा अधिक वेळा यासाठी अर्ज केलेला होता. तसेच वेगवेगळ्या कॅटेगरीतून सुद्धा भरपूर प्रतिसाद मिळत आहे.

1987 मध्ये स्थापन झालेल्या अपीजय सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेडने हॉस्पिटॅलिटी बिझनेसमध्ये खूप मोठे नाव कमावलेले आहे. 1923 एवढी त्यांची कर्मचारी संख्या आहे. त्यांच्याकडे द पार्क कलेक्शन, द पार्क, स्टॉप बाय झोन आणि झोन बाय द पार्क यांसारखे टॉप ब्रँडस् आहेत. भारतातील चेन्नई, नवी दिल्ली, मुंबई, नवी मुंबई, इंदोर, हैदराबाद, जम्मू, बेंगलोर, पठाणकोट, जयपुर, विशाखापट्टणम, पोर्ट ब्लेअर आणि कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये 80 रेस्टॉरंट आहेत.

असे आहेत Apeejay Surrendra Park Hotels IPO details

या आयपीओमधून कंपनीचे उद्दिष्ट 920 कोटी रुपये उभारण्याचे आहे. यातून कंपनीचे मुख्य उद्दिष्ट कर्जाची परतफेड करण्याचे आहे.Apeejay Surrendra Park Hotels IPO details (1)

प्राईस बँड

147 ते 155 रुपये प्रति शेअर असा प्राइस बँड ठेवण्यात आलेला आहे. याची फेस व्हॅल्यू 1 रुपये ठेवण्यात आली आहे. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना 7 रुपयांचा डिस्काउंट भेटेल.

महत्त्वाच्या तारखा

5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान सर्वांना अर्ज करण्याची मुभा असेल. 8 ला अलॉटमेंट भेटेल आणि 9 फेब्रुवारीला रिफंड जमा होईल. 12 तारखेला BSE आणि NSE वर लिस्ट होईल.

लॉट साइज आणि किंमत

एका लॉटमध्ये 96 शेअर्स असणार आहेत. या सर्वांची किंमत जवळपास 14,880 रुपये ठेवण्यात आली आहे.

कंपनीचे प्रमोटर्स

प्रिया पॉल, करण पॉल, ग्रेट ईस्टर्न स्टोअर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि अपीजय सुरेंद्र ट्रस्ट यांचा प्रमोटर्समध्ये समावेश आहे.

Apeejay Surrendra Park Hotels IPO Gmp

ग्रे मार्केटमध्ये 50 रुपयांच्या प्रीमियमवर हा स्टॉक ट्रेड करत आहे. काही दिवसांपूर्वी हाच प्रीमियम 70 रुपयांवर होता. त्यामुळे अर्ज करणाऱ्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघावी, असा तज्ञांकडून सल्ला देण्यात आला आहे.

Apeejay Surrendra Park Hotels IPO Review

मारवाडी फायनान्शियल सर्व्हिसेस, चॉईस ब्रोकिंग, मेहता इक्विटीज, सुशील फायनान्स आणि आनंद राठी रिसर्च यांच्याकडून सबस्क्राईब असे टॅग देण्यात आलेले आहे. यातील आनंद राठी रिसर्च आणि मेहता इक्विटीजने जास्त काळासाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. चॉईस ब्रोकिंगने मात्र खबरदारीने अर्ज करण्यास सांगितले आहे.

(डिस्क्लेमर: आम्ही येथे फक्त बिजनेस बद्दल न्यूज शेअर करतो आणि कुठल्याही प्रकारच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत नाही)

जाणून घ्या BLS E Services IPO Details मग म्हणू नका सांगितलं नाही

1 thought on “Apeejay Surrendra Park Hotels IPO ला गुंतवणूकदारांकडून मिळतोय चांगला प्रतिसाद”

  1. Pingback: Capital small finance Bank IPO बद्दल माहिती - Nationdaily.in

Comments are closed.

Scroll to Top