Air India Airbus A350: एअर इंडियाच्या एअरबसने भरले उड्डाण, आता पुन्हा एकदा बनणार महाराजा!

Air India Airbus A350: एअर इंडियाच्या एअरबस ए350 ने पहिल्यांदा बंगलोर मधून उड्डाण भरल्यानंतर मुंबईपर्यंतचा प्रवास केला.

एअर इंडियाने प्रथमच भारतामध्ये अशा पद्धतीची विमान सेवा चालू केली आहे. Air India Airbus A350 ने बंगलोरच्या कॅम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्टवरून मुंबईसाठी झेप घेतली होती. 316 प्रवाशांची कॅपॅसिटी असलेल्या या विमानात जवळपास 297 प्रवासी होते. या यशस्वी फ्लाईटनंतर कंपनीने मुंबई, बंगलोर, हैदराबाद, दिल्ली आणि चेन्नई या ठिकाणी सुद्धा या पद्धतीची विमानसेवा पुरवण्याची योजना आखलेली आहे. सार्क देशांमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचे एअरक्राफ्ट वापरण्यात येणार आहे.

Air India Airbus A350

चेन्नई पर्यंत केला दुसरा प्रवास

बंगलोर ते मुंबई असा प्रवास केल्यानंतर या विमानाने मुंबई ते चेन्नई असा दुसरा प्रवास केला. या फ्लाईट मध्ये 314 प्रवासी होते, त्यापैकी 12 हे कर्मचारी होते. दोन इंटरनॅशनल ट्रॅव्हल व्लॉगर्स जॉश आणि सॅम चुई हे सुद्धा होते.

Air India Airbus A350

अशी आहे Air India Airbus A350-900

तब्बल 18,000 किलोमीटरची रेंज या एअरबसची आहे. याच्या 316 सीट्स मध्ये 28 प्रायव्हेट बिजनेस सूटस हे बेड सोबत असणार आहेत. यात 264 इकॉनोमी आणि 24 प्रीमियम इकॉनोमी सीट्स आहेत. हे एक ट्वीन इंजिन असलेले एअरक्राफ्ट आहे. प्रवाशांना अगदी आरामशीर बसता यावे, यासाठी आसन व्यवस्था व्यवस्थित डिझाईन केलेली आहे. यात प्रत्येक सीट समोर एक एचडी स्क्रीन असलेली एंटरटेनमेंट सिस्टीम देण्यात आलेली आहे. ज्यामुळे प्रवास करताना लोकांना कंटाळा येणार नाही. याची क्षमता वाढवण्यासाठी रोल्स रॉईसचे इंजिन देण्यात आले आहे. कंपनीकडून दावा करण्यात आला आहे की, हे प्लेन मार्केट मधील इतर विमानांपेक्षा 20% कमी इंधनाचा वापर करते.

टाटा कंपनीने याच्या माध्यमातून पुन्हा एकदा भारतीय विमान सेवेत एअर इंडियाला महाराजा बनवण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. या कंपनीला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. भारतात सध्या इंडिगो ही एक नंबरची कंपनी आहे.

FAQ

  1. एअर इंडियाकडे A350 आहे का?

    होय, त्यांच्याकडे आहेत.

  2. Air इंडिया कडे किती A350 आहेत?

    त्यांच्याकडे जवळपास 20 अशा एअरबस आहेत.

  3. A350 एवढ स्पेशल का आहे?

    हे स्पेशल असण्याचे कारण की, इतर विमानांपेक्षा 20 टक्के कमी इंधन वापरते.

  4. प्लेन इंधनाशिवाय किती वेळ चालू शकते?

    जवळपास 23 तासांमध्ये हॉंगकॉंग ते लंडन असा प्रवास एका जेटने पहिलेच इंधन भरल्यानंतर केला होता.

Tata coffee merger: टाटा कॉफीच्या शेअर्स होल्डरला अशा प्रकारे मिळणार शेअर्स

Comments are closed.

Scroll to Top