भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खास आहे! आज सकाळी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर BHELच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. वाढ किती झाली तर, तब्ब्ल! 14 टक्क्यांहून अधिक! या वाढीमुळे शेअर्सची किंमत आठ वर्षांच्या उच्चांकावर म्हणजेच ₹269.35 इतकी पोहोचली आहे.
BHEL Share News आली असं काय झालंय विशेष?
या BHEL Share News मधील कारणं खूपच महत्वाची आहेत. चला तर एकामागूनएक समजून घेऊया –
NTPC ची मोठी गुंतवणूक
NTPC च्या संचालक मंडळाने सिंगरौली सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्टच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ₹ 17,195.3 कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या बांधकामासाठी BHEL ही एकमेव बोली लावणारी कंपनी होती. त्यामुळे या मोठ्या गुंतवणुकीमुळे त्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे आणि याच कारणास्तव गुंतवणुकदारांचा कंपनीच्या शेअर्सवर विश्वास वाढला. (Source: https://economictimes.indiatimes.com/)
कोल इंडियासोबत भागीदारी
गेल्या आठवड्यात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने कोल इंडिया (CIL) सोबत संयुक्त उपक्रम करारावर (JVA) स्वाक्षरी केली. या अंतर्गत कोळसा ते रसायने व्यवसाय करण्यात येणार आहे. यामुळे नवीन क्षेत्रात पदार्पण करत असून कंपनीच्या विकासाची दिशा सकारात्मक दिसत आहे. गुंतवणुकदारांना हा एक चांगला संकेत वाटला.
बाजारात चांगली गती
शेअर बाजारात सध्या चांगली गती आहे. त्यामुळे इतर अनेक कंपन्यांच्याप्रमाणे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या शेअर्समध्येही वाढ होतेय.
या बातमीचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे?
तुम्ही BHEL चे शेअरधारक असाल तर आज तुमचा दिवस आहे! तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्याचं हे एक उत्तम लक्षण आहे.
गुंतवणुकदार नसाल तरी ही BHEL Share News अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक आहे. कारण यासारख्या मोठ्या कंपनीच्या चांगल्या कामगिरीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते.
पुढे काय?
ही तेजी कायम राहणार का? याचा अंदाज बाजारच लावू शकेल. पण कंपनी नवीन क्षेत्रात पदार्पण करत असून मोठ्या प्रकल्पांची जबाबदारी घेत आहे, हे कंपनीच्या भविष्यासाठी सकारात्मक संकेत आहेत.
आरबीआयने एसबीआय सोबत इतर 2 बँकांना ठोठावला दंड
Disclaimer: हा लेख फक्त माहितीसाठी आहे आणि कोणत्याही गुंतवणूक सल्ल्याचा भाग नाही. कोणत्याही वित्तीय निर्णय घेण्यापूर्वी योग्य तज्ञांचा सल्ला घ्यावा.