WhatsApp green colour: काही व्हाट्सॲप युजर्स ॲप उघडताच आश्चर्यचकित झाले. पूर्वी निळा असलेला रंग आता हिरवा झालेला त्यांना दिसला. हा बदल बऱ्याच जणांना आवडला नाही. अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. “हा रंग नक्की कोणी बदलला?” असा प्रश्न एका युजरनेस सोशल मीडियावर विचारला होता.
WhatsApp green colour चे मुख्य कारण
मेटा कंपनीच्या म्हणण्यानुसार, मॉडर्न आणि नवीन अनुभव देण्यासाठी आणि अधिक यूजर फ्रेंडली बनवण्यासाठी व्हाट्सॲपचा रंग हिरवा करण्यात आला आहे. हे नवीन अपडेट हळूहळू सर्व वापरकर्तांपर्यंत पोहोचणार आहे. हा केलेला बदल पुन्हा पूर्वीसारखा करण्यात येणार नाही. त्यामुळे वापरणाऱ्याला आता येत नवीन बदलाची सवय करून घ्यावी लागणार आहे. सर्व आयओएस डिव्हाइसवर हा बदल दिसून येणार आहे. ब्रँडला साजेसा आणि जास्त कस्टमर पर्यंत पोहोचण्यासाठी हे अपडेट केले गेल्याचे सांगितले जात आहे.
अँड्रॉइड डिव्हाइससाठी, चिन्ह आधीच हिरवे होते. मात्र, आता त्याचा रंग थोडा बदलणार आहे, परंतु तो फारसा लक्षणीय नसेल. अँड्रॉइडचा वापर करणाऱ्यांसाठी लोगो आधीपासूनच तसा होता आणि नवीन अपडेट मध्ये अजून थोडासा वेगळा दिसेल. आयओएसच्या तुलनेमध्ये हा बदल काहीच नाही.
मुख्य वेगळेपण
आयओएस युजर्ससाठी WhatsApp green colour नाही, तर काही चिन्हे आणि बटनांचे स्वरूप सुद्धा बदलले आहे. तुमच्या स्मार्टफोनवर दिसणारे लोगो आणि चिन्हे यांचे आकार आणि रंग वेगळे दिसतील. त्याचबरोबर युजरला चांगल्या पद्धतीने वापरता येण्यासाठी बटन्स मधील अंतर वाढवण्यात आले आहे.
अँड्रॉइड युजर्ससाठी
अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी, वेगळे अपडेट येत आहेत. डार्क मोड आणखी गडद आणि मोबाईलवर कुठलाही लेख वाचण्यासाठी अगदी सहजरित्या वापर करता येणार आहे. याशिवाय, चॅट टॅबमध्ये आता लोगो दिसणार आहे आणि स्क्रीनच्या वरच्या बाजूला असलेले टॅब आता खालील बाजूला दिसेल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
व्हाट्सॲप आता हिरवे का झाले?
मेटा कंपनीच्या म्हणण्यानुसार, ॲप अधिक आधुनिक आणि वापरकर्ता-स्नेही बनवण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
हा बदल केव्हा येईल?
हा बदल हळूहळू सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचेल.
डिलिव्हरी ॲप ब्लिंकइट पडले बंद युजर्सला झाला मनस्ताप