HAL Dividend: भारत सरकारची डिफेन्स सेक्टर मधील कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ने त्यांचे क्वार्टरली रिझल्ट जाहीर केलेले आहेत. या तिमाहीत त्यांना चांगला नफा झाल्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांनी अंतरिम डिविडेंड देण्याचे जाहीर केले आहे. ही बातमी ऐकून शेअर होल्डर्समधे आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या डिफेन्स सेक्टरमध्ये ही कंपनी एक मोनोपॉली आहे. 23 डिसेंबर 1940 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. बेंगलोर शहरामध्ये त्यांचे मुख्यालय आहे. सरकारकडे या कंपनीची 71.65% मालकी आहे. ही आशियामधील सर्वात मोठी एरोस्पेस कंपनी आहे. त्यांचा वार्षिक टर्नओव्हर 3 बिलियन डॉलरचा आहे.
क्वार्टरली रिझल्ट आणि HAL Dividend बद्दल माहिती
तिमाहीचे निकाल
हिंदुस्तानी एरोनॉटिक्स लिमिटेडच्या उत्पन्नात 60 टक्क्यांची वाढ पाहायला मिळालेली आहे. 2023 च्या आर्थिक वर्षात तिसऱ्या क्वार्टर मध्ये महसूल ₹5,666 कोटींवर होता आणि आता 2024 च्या आर्थिक वर्षात याच काळात तो ₹6,061 कोटींवर पोहोचलेला आहे. त्यानंतर गुंतवणूकदारांना खुश करण्यासाठी HAL Dividend सुद्धा देणार आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा निव्वळ नफा हा ₹1155.19 कोटींवरून ₹1261.5 कोटींवर पोहोचलेला आहे. त्यांचा EBITDA हा ₹435 कोटींपर्यंत गेला आहे, जो की मागच्या काळात ₹985 कोटी होता. HAL चे EBITDA मार्जिन 7.4% वरून 23.7% पर्यंत गेले आहे. आता त्यांचे मार्केट कॅप ₹1,91,000 कोटींवर आले आहे.
अंतरिम लाभांशसाठी रेकॉर्ड डेट
HAL Dividend साठी 20 फेब्रुवारी 2024 ही रेकॉर्ड डेट ठेवण्यात आली आहे. या तारखेपर्यंत ज्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये हा स्टॉक असेल, त्यांनाच अंतरिम लाभांश मिळणार आहे. हा लाभांश 22 रुपये प्रति शेअर ने दिला जाणार आहे.
शेअरची किंमत आणि इतर माहिती
तिमाहीचे निकाल आल्यानंतर स्टॉकमध्ये काहीशी घसरण पाहायला मिळाली. मागील काही दिवसांपासून कन्सोलिडेशन झोनमध्ये हा ट्रेड करत आहे. रिझल्ट आल्यानंतर यात 5 टक्क्यांपर्यंत पडझड झालेली होती. दुसऱ्याच दिवशी त्यामध्ये 2.7 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. हा शेअर सध्या 2,900 रुपयांच्या आसपास ट्रेड करताना दिसत आहे. मागील 1 वर्षांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्तीचे रिटर्न्स दिलेले आहेत आणि मागील सहा महिन्यात 34 टक्क्यांचा परतावा दिलेला आहे. गुंतवणूकदारांचा या कंपनीवर खूप विश्वास आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून यामध्ये रॅली बघायला मिळत होती.
Hindalco News: हिंडाल्कोचा शेअर तब्बल 14 टक्क्यांनी पडला!!