भारत फोर्जने त्यांचे क्वार्टरली निकाल नुकतेच जाहीर केले आहेत. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला या क्वार्टरमध्ये चांगला नफा झालेला आहे. गुंतवणूकदारांना नेहमीच Bharat Forge dividend देण्यासाठी ओळखली जाते. रिझल्ट आणि डिविडेंड जाहीर केल्यानंतर त्यांच्या शेअरमध्ये कमालीची पडझड पाहायला मिळाली.
भारत फोर्ज ही ऑटोमोबाईल, एरोस्पेस, कन्स्ट्रक्शन, डिफेन्स आणि एनर्जी यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर बाबा कल्याणी आहेत.
Bharat Forge dividend आणि रिझल्टबद्दल इतर माहिती
क्वॉर्टरली रिझल्ट
त्यांचा नफा 79 कोटी रुपयांवरून वाढून 254 कोटी रुपये झालेला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना लाभांश देऊन खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महसूल हा 3,353 कोटी रुपयांवरून 3,886 कोटी रुपये झालेला आहे. त्याचबरोबर EBITDA हा 469 कोटी रुपयांवरून वाढून 698 कोटी रुपयांवर गेलेला आहे.
डिविडेंड
ही कंपनी कायमच हिस्सेदारांना डिविडेंड देण्याचे काम करत असते. 2001 पासून त्यांनी ही परंपरा सुरू ठेवलेली आहे. Bharat Forge dividend भेटणार असल्यामुळे गुंतवणूकदार आनंदी आहेत. कंपनीची वाढती प्रगती आणि झालेला नफा यामुळे 2.50 रुपये प्रत्येक शेअर मागे लाभांशची रक्कम ठरवण्यात आली आहे. 2005 मध्ये त्यांनी आतापर्यंतचा सर्वात जास्त लाभांश 12.5 रुपये शेअरहोल्डर्सला दिला होता. यासाठी रेकॉर्ड 23 फेब्रुवारी 2024 ठेवण्यात आली आहे.
निकालानंतर मॅनेजिंग डायरेक्टरांनी दिली प्रतिक्रिया
मॅनेजिंग डायरेक्टर बाबा कल्याणी यांनी सांगितले की, आता निकाल खूप चांगले आले आहेत. असे असले तरी येणाऱ्या 2025 या आर्थिक वर्षात कंपनीची वाढ आपल्याला ही काहीशी धीम्या गतीने होताना दिसेल. तसेच एक्सपोर्ट मध्ये सुद्धा अशीच स्थिती बघायला मिळेल.
या बातमीनंतर शेअर लोअर सर्किटवर
Bharat Forge dividend आणि रिझल्टची बातमी बाहेर आल्यानंतर स्टॉक तब्बल 14 टक्क्यांनी कोसळला. हा फ्युचर आणि ऑप्शनचा स्टॉक असल्याने यात दहा टक्क्यांवर लोअर सर्किट लागले होते. हे पुन्हा खुले झाल्यानंतर शेअर पुन्हा पडू लागला आणि परत पाच टक्क्यांवरती यात लोअर सर्किट लागले. 1330 रुपये अशा दिवसाच्या उच्चांकी किमतीवरून हा शेअर दिवसाच्या अखेरीस 1,131 रुपयांच्या किमतीवर बंद झाला. दोनदा सर्किट लागल्यामुळे या स्टॉकवर खूप दबाव असल्याचे दिसत होते. तज्ञांच्या मते, कंपनी फंडामेंटली खूप मजबूत असल्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच पुन्हा वर जाण्यासाठी हा शेअर सज्ज होईल.
खुशखबर! पेटीएमचे तब्बल 50 लाख शेअर्स खरेदी केले या कंपनीने