Upcoming IPO This Week
सध्या शेअर बाजारामध्ये खूप साऱ्या कंपन्या त्यांचे इनिशियल पब्लिक ऑफरिंगसाठी येत आहेत. यात मुख्य कारणांमध्ये कर्जाचा परतावा आणि बिझनेस वाढवण्यासाठी लागणारे पैसे जमवणे यांचा समावेश आहे. बऱ्याच कंपन्या लिस्टिंगच्या दिवशीच गुंतवणूकदारांना मालामाल करतात. अशाच मालामाल करणाऱ्या Upcoming IPO this week मध्ये 5 कंपन्यांचा समावेश आहे, त्यांची माहिती आम्ही या ठिकाणी देणार आहोत. यामध्ये एसएमई आणि मेनबोर्ड अशा दोन्ही प्रकारांचा समावेश आहे.
त्याचबरोबर नऊ कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होणार आहेत. या लिस्ट होणाऱ्या कंपन्यांमध्ये एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स, इटालियन एडीबल्स, जना स्मॉल फायनान्स बँक, राशी पेरीफेरल्स, कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक, अल्पेक्स सोलर, रुद्र गॅस एंटरप्राइजेस, पॉलिसील इरिगेशन सिस्टम आणि हेल्थकेअर सोल्युशन्स यांचा समावेश आहे.
अशी आहे Upcoming IPO This Week यादी
Kalaharidhan Trendz limited IPO
15 फेब्रुवारी रोजी इनिशियल पब्लिक ऑफरिंगसाठी खुला होणारी Kalaharidhan trendz limited ही SME विभागातील आहे. त्यामुळे याची लॉट साईज 3000 शेअर्सची असणार आहे. त्यांची किंमत 135,000 रुपये ठेवण्यात आली आहे आणि एकाची किंमत 45 रुपये आहे.
वाईज ट्रॅव्हल इंडिया लिमिटेड
आठवड्याच्या पहिल्याच म्हणजेच 12 तारखेला सर्वांना अर्ज करण्यासाठी उपलब्ध झालेला असेल आणि शेवटची तारीख 14 फेब्रुवारी असणार आहे. यासाठी लॉट साइज 1000 शेअर्सची असून प्राईस बँड हा 140 ते 47 रुपये आहे. यातून कंपनी 94.68 कोटी उभारणार आहे.
थाई कास्टिंग लिमिटेड
Upcoming IPO This Week च्या यादीमध्ये यांचा तिसरा क्रमांक लागतो. 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान यासाठी अर्ज करता येईल. यासाठी प्राईस बँड हा 73 ते 77 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आलेला आहे आणि लॉट साइज 1600 ची आहे. यातून ₹47.20 कोटी उभारण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
विभोर स्टील ट्यूब लिमिटेड
13 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत असेल. याची लॉट साईज 99 स्टॉक्सची ठेवण्यात आली आहे आणि प्राईस बँड 141 ते 151 रुपये आहे. या एका लॉटची किंमत ₹14,949 ठेवली आहे.
Atmastco Limited
15 ते 20 तारखेदरम्यान अप्लाय करता येईल. लॉट साइज 1600 ची असणार आहे आणि एकाची किंमत 77 रुपये ठेवली आहे.
Upcoming IPO This Week च्या या यादीमध्ये फक्त एकच मेनबोर्ड प्रकारातील आहे आणि इतर चार एसएमई प्रकारातील आहे.
अबब! Entero Healthcare Solutions IPO मधून उभारणार 1600 कोटी रुपये