Zydus Lifesciences Buyback करणार आहे. या फार्मा सेक्टरमधील कंपनीने येणाऱ्या काळात बायबॅक करणार असल्याची माहिती मीडियाला दिली आहे. शेअर होल्डरसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. या कंपनीचे रिझल्ट आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. ही सर्व प्रक्रिया टेंडर रूट मधून घेतली जाणार आहे. हा निर्णय झाल्यानंतर त्यांच्या शेअर्स मध्ये कमालीची तेजी पहायला मिळाली.
Zydus Lifesciences Buyback बद्दल माहिती
या बायबॅकसाठी किंमत 1,009 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे. 600 कोटी रुपयांचा हा सर्व Zydus Lifesciences Buyback असणार आहे. 6 फेब्रुवारी रोजी ही बातमी त्यांच्याकडून जाहीर करण्यात आली. त्यानंतर स्टॉक्स मध्ये जबरदस्त उसळी पहायला मिळाली. 9 फेब्रुवारी रोजी त्यांच्या बोर्डाकडून या प्रपोजलवर माहिती देण्यात येणार आहे. जून 2022 मध्ये अशीच प्रक्रिया राबवण्यात आली होती. हा त्यांचा दुसरा बायबॅक असणार आहे.
आले जबरदस्त रिझल्ट
ज्यांच्याकडे या कंपनीची हिस्सेदारी आहे, त्यांच्यासाठी रिझल्ट चांगले लागल्याची दुसरी आनंदाची बातमी होती. त्यांच्या रिझल्टमध्ये अतिशय चांगली वाढ पहायला मिळाली. त्यांच्या रिव्हेन्यू आणि प्रॉफिटमध्ये उत्तरोत्तर वाढ होत आहे. त्यांचे सेल्स नंबरही खूप चांगले आहेत. त्यांच्या प्रॉफिटमध्ये 26.8 टक्क्यांची दरवर्षी वाढ पहायला मिळत आहे. मागील क्वार्टरमध्ये ₹623 कोटींचा असणारा नफा डिसेंबर क्वार्टरमध्ये 790 कोटी रुपयांवर पोहोचला होता. EBITDA मध्ये 15.27 अशी वार्षिक ग्रोथ दिसत आहे. असे यावरून म्हणता येते की, हा EBITDA मागील क्वार्टर मध्ये 956 कोटी रुपये होता आणि आता 1102 कोटी रुपयांवर गेला आहे.
बातमीनंतर स्टॉक मध्ये तेजी
आता हा स्टॉक त्याच्या 52 आठवड्यांच्या सर्वोच्च किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 6 महिन्यांमध्ये त्याने गुंतवणूकदारांना 20 टक्के आणि वर्षांमध्ये 65 टक्के रिटर्न्स दिले आहेत. Zydus Lifesciences Buyback ची बातमी बाहेर आल्यानंतर यामध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळाली. एका आठवड्यात हा शेअर 10% वरती आहे. आता हा स्टॉक सध्या 805 रुपयांवर ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते, फार्मा सेक्टर मधील ही एक उत्तम कंपनी आहे. आपण जर चार्ट वर बघितले तर दिसेल की, फार्मा इंडस्ट्री मधील हा एक मल्टीबॅगर आहे. ॲनालिस्टच्या मते, यामध्ये एक स्ट्रॉंग बाईंग मोमेंटम आहे. त्यामुळे यात आता गुंतवणूक करणे धोक्याचे असू शकते.
KFC in Ayodhya होणार पण या आहेत अटी