Zomato ला ऑर्डर मागे मिळतात एवढे रुपये, ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

..............................................................

फूड डिलिव्हरी ऑर्डरमध्ये Zomato एक नंबरला आहे आणि त्यानंतर स्विगी, ब्लिंकिट यांसारख्या विविध कंपन्या आहेत.

..............................................................

शेअर बाजारामध्ये झोमॅटोचा आयपीओ आल्यापासून त्यांच्या कंपनीत खूप मोठे बदल झाले आहेत.

..............................................................

घरबसल्या उत्तम प्रतीचे जेवण ऑर्डर करण्यासाठी खूप जण फूड डिलिव्हरी ॲप वरून मागवतात.

..............................................................

या कंपनीचे सीईओ दीपिंदर गोयल हे सध्या शार्क टॅंक इंडिया या शोमध्ये जज म्हणून काम करत आहे.

..............................................................

त्यांनी नुकताच इंटरव्ह्यू दिलेल्या रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये झोमॅटोला प्रत्येक ऑर्डर मागे होणाऱ्या फायद्याबद्दल माहिती दिली.

..............................................................

यात त्यांनी सांगितले की, ग्राहकांनी आमच्या ॲपवरून फूड मागवल्यानंतर आम्हाला त्यातून 20 टक्क्यांची कमाई होते.

..............................................................

याचे उदाहरण द्यायचे झालं तर 200 रुपयांची बिर्याणी मागवल्यानंतर त्यातील 40 रुपये हे त्यांना मिळतात.

..............................................................

यामध्ये अंतरानुसार सुद्धा पैसे चार्ज केले जातात आणि इतर खर्च पकडून त्यांना प्रत्येक ऑर्डर मागे 5 ते 10 रुपये शिल्लक राहतात.