अबब! Entero Healthcare Solutions IPO मधून उभारणार 1600 कोटी रुपये

Entero Healthcare Solutions IPO

Entero Healthcare Solutions IPO मधून 1600 कोटी रुपये उभारणार असल्याचे समोर आले आहे. 9 फेब्रुवारी पासून हा आयपीओ सर्वांसाठी खुला होणार आहे.

2018 मध्ये स्थापन झालेली Entero Healthcare Solutions लिमिटेड एक हेल्थकेअर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूटर कंपनी आहे. हॉस्पिटल, क्लिनिक्स आणि मेडिकलला प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूशनची सर्विस देण्याचे काम करते. त्यांच्याकडे 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये 73 वेअर हाऊस आहेत. त्यांचा कस्टमर बेस ही त्यांची स्ट्रेंथ आहे. त्यांचा कस्टमर बेस मध्ये जवळपास 3,400 हॉस्पिटल्स आणि 81,400 फार्मसी आहेत. या डिस्ट्रीब्यूटर कंपनीची 3,014 कर्मचारी संख्या आहे. त्यांच्या टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म वरून ही सर्व प्रक्रिया चालते. FY23 मध्ये त्यांचा हा 30.84% ने वाढला आणि प्रॉफिट 65.28 टक्क्यांनी वाढला.

Entero Healthcare Solutions IPO Details

टोटल इशू साइज

या आयपीओ द्वारे कंपनी 1,27,18,600 शेअर्स भारतीय स्टॉक मार्केटमध्ये आणणार आहे. यातून कंपनीचे उद्दिष्ट 1600 कोटी रुपये जमवण्याचे आहे.

Entero Healthcare Solutions IPO details

प्राईस बँड

प्राईस बँड हा 1,195 ते 1,258 रुपये ठेवण्यात आलेला आहे. यात किंमत थोडीशी जास्त असल्यामुळे ग्राहकांकडून किती प्रतिसाद मिळतो, हे पहाणे उत्सुकतेचे असेल. कर्मचाऱ्यांसाठी 119 रुपयांचा डिस्काउंट प्रत्येक स्टॉक मागे ठेवण्यात आलेला आहे.

महत्त्वाच्या तारखा

9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान यासाठी अर्ज करता येणार आहे. 14 तारखेला अलॉटमेंट जाहीर करण्यात येईल आणि 16 फेब्रुवारीला NSE आणि BSE वर Entero Healthcare Solutions IPO लिस्ट होईल.

लॉट साइज

एका लॉटमध्ये 11 शेअर्स असतील. यांची किंमत 13,838 ठेवण्यात आली आहे. रिटेल कोटाला जास्तीत जास्त 14 लॉटला अर्ज करण्याची परवानगी आहे.

प्रमोटर्स

प्रेम सेठी, प्रभात अग्रवाल आणि ऑर्बीमेड एशिया यांची इनिशियल पब्लिक ऑफरिंगच्या अगोदर 77.11% हिस्सेदारी होती.

जीएमपी

कुठल्याही लिस्टिंगच्या अगोदर प्रत्येक जण त्याची जीएमपी काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हा प्रीमियम प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक असते. Entero Healthcare Solutions IPO gmp सध्या 118 रुपये चालू आहे. बाजारामध्ये येईपर्यंत जर ही किंमत अशीच राहिली तर गुंतवणूकदारांना नऊ टक्के रिटर्न मिळू शकतात.

ही कंपनी फंडामेंटली मजबूत असल्यामुळे तज्ज्ञांनी सांगितले आहे की, लॉन्ग टर्म मध्ये यात चांगलाच परतावा मिळू शकतो. लिस्टिंगच्या दिवशी जरी रिटर्न्स भेटले नाही, तरी येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांना फायदा मिळू शकतो, असे अनिल सिंघवींचे मत आहे.

Capital small finance Bank IPO बद्दल माहिती

Scroll to Top